0
यांनी उडविले एयर इंडियाचे पहिले फ्लाईट, आता त्यांचीच कंपनी सरसावली या कामाला

मुंबई- टाटा ग्रुप आता पुन्हा एकदा एयर इंडियाला विकत घेण्याच्या तयारीत आहे. जेआरडी टाटा यांनी टाटा एयरलाईन्सची स्थापना 1932 मध्ये केली होती. 1953 मध्ये जेव्हा सरकारने एयर इंडियाचे राष्ट्रीयकरण केले तेव्हा टाटा ग्रुपने ही कंपनी सरकारकडे सोपवली होती. सरकार तोट्यात असलेल्या एयर इंडियाला विकण्याच्या तयारीत आहे. तर सूत्रांच्या माहितीनुसार, मूळची आपली असलेली ही कंपनी टाटा पुन्हा विकत घेण्याची तयारीत आहे. सरकारही टाटांनीच हा कंपनी घ्यावी या मतापर्यंत पोहचली आहे कारण एयर इंडिया मूळची टाटांनी स्थापन केलेली कंपनी आहे. साहजिकच याची सूत्रे पुन्हा टाटा समूहाकडे जावीत असे सर्वांनाच वाटत आहे. जेआरडी देशातील पहिले कॉमर्शियल पायलट होते आणि कराची ते बॉम्बे अशी पहिली फ्लाईट स्वत: जेआरडी टाटा यांनीच उडविले होते. सरकारने असा घेतला होता एयर इंडियाचा ताबा...
- स्वातंत्र्याच्या आधी 1946 मध्ये टाटा एयरलाईन्स सार्वजनिक कंपनी बनली आणि त्याचे नाव बदलून एयर इंडिया केले.
- विमाने उडविणे हा जेआरडी टाटा यांचे स्वप्न आणि शौक होता. विमान उडवायला पात्र ठरणारे ते पहिले भारतीय पायलट होते. विमान उडविण्याचे लायसन्स त्यांना 1929 मध्ये मिळाले होते. भारतात कॉमर्शियल एविएशन आणणारे ते पहिले व्यक्ती ठरले. 
- 1948 मध्ये त्यांनी एयर इंडिया इंटरनॅशनलची स्थापना केली. 1978 पर्यंत ते एयर इंडियाची जबाबदारी सांभाळत होते.
- 1953 मध्ये जेव्हा सरकारने 'बॅकडोरमधून' एयर इंडियाचे राष्ट्रीयकरण केले तेव्हा ही कंपनी जगातील सर्वोत्तम एयरलाईन्स पैकी एक होती. 
- तत्कालीन पीएम जवाहर लाल नेहरू यांनी एयर इंडियाचे राष्ट्रीयकरण टाटा यांना न सांगताच केल्याने त्यांना धक्का बसला. मात्र आपल्याला देशाला अर्पण करताना आनंदच होत असल्याचे सांगितले. 
- नंतर नेहरूंनी जेआरडी टाटा यांना एयर इंडियाचे राष्ट्रीयकरण केल्यानंतरही त्याच्या चेयरमनपदावर कामय ठेवले. त्यांच्या नेतृत्वाखाली ही कंपनी 1977 पर्यंत चांगली चालत होती. 
- मात्र, 1977 मध्ये सत्तांतर झाले आणि मोरारजी देसाई पंतप्रधान होताच त्यांनी टाटांना तेथून हटविले.

Post a Comment

 
Top