0
काश्मीर खोऱ्यात सुरक्षा दलांना अनेकदा दगडफेकीचा सामना करावा लागतो. अशावेळी पैलेट गन ऐवजी अन्य पर्याय वापरण्याची सूचना सुप्रीम कोर्टाने केल्याने सुरक्षा दलांनी प्लॅस्टिक बुलेट्सचा पर्याय शोधून काढला आहे.

पुणे/मेरठ- काश्मीरमध्ये दगडफेक करणाऱ्यांना रोखण्यासाठी आता प्लॅस्टिक बुलेटचा वापर करण्यात येणार आहे. त्यासाठी या बुलेट तयार करण्यात आल्या आहेत. या बुलेट पैलेट गनपेक्षा कमी हानी करतात. पैलेट गनच्या वापराविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. यात पैलेट गनमुळे होणाऱ्या हानी माहिती देण्यात आली होती.
कुठे तयार करण्यात आल्यात या प्लॅस्टिक बुलेट्स
या प्लॅस्टिक बुलेट्स डीआरडीओने तयार केल्या आहेत. पुण्यातील दारुगोळा कारखान्यात या तयार करण्यात आल्या आहेत.
CRPF करणार वापर

दगडफेक करणाऱ्यांवर एके-47 मधून डागण्यात येणार प्लॅस्टिकच्या बुलेट्स
- CRPF चे DG आर. आर. भटनागर यांनी सांगितले की, काश्मीरमधील लॉ अॅण्ड ऑर्डर आणि निर्दशने करणाऱ्यांना रोखणे ही आव्हाने CRPF ला पार पाडावी लागतात. त्यांना आता AK-47 आणि AK-56 वापर करुन या निर्दशने आणि दगडफेक करणाऱ्यांचा सामना करावा लागणार आहे. या नवी प्लॅस्टिक बुलेट्स एके सिरीजच्या रायफलमधून डागता येणार आहेत.
दगडफेक झाल्यावर बुलेट्स बदलण्याची गरज
- टेस्टमध्ये या प्लॅस्टिक बुलेटस कमी घातक असल्याचे समोर आले आहे. यात गर्दीला नियंत्रित करण्यासाठी पैलेट गन आणि अन्य दुसरी नॉन-लीथल वेपन्सचा वापर करणे कमी होणार आहे. हे सगळ्यात कमी घातक हत्यार असणार आहे.

Post a Comment

 
Top