0

आरुषी मर्डर: तलवार दाम्पत्याची डासाना तुरुंगातून सुटका, शुक्रवारपासून पाहात होते आदेशाची वाट

गाझियाबाद - आरुषी मर्डर केसमध्ये अलाहाबाद हायकोर्टाने 12 ऑक्टोबरला राजेश आणि नूपुर तलवारला सोडण्याचे आदेश दिले होते. तलवार दाम्पत्याचे वकील मनोज सिसोदिया यांनी सांगितले की गाझियाबाद सीबीआय कोर्टाने सुटकेचे आदेश जारी केले आहेत. सोमवारी सायंकाळपर्यंत त्यांची तुरुंगातून सुटका होईल. नोव्हेंबर 2013 पासून राजेश आणि नूपुर तलवार गाझियाबादच्या डासना तुरुंगात कैदेत आहेत. तुरुंग प्रशासनाला कोर्ट आदेशाची प्रत मिळाली नसल्यामुळे 3 दिवसांपासून तलवार दाम्पत्य सुटकेच्या प्रतिक्षेत होते. तुरुंगातून सुटका झाल्यानंतर दर 15 दिवसांनी राजेश तलवार कैद्यांच्या दंत चिकित्सेसाठी तुरुंगात येणार आहे.
सशर्त आहे सुटका
- तलवार दाम्पत्याच्या सुटकेचे आदेश हे अलहाबाद हायकोर्टाने दिले आहेत. कोर्टाने त्यांची सशर्त सुटका केली आहे. सीबीआय कोर्टाचे जन्मठेपेच्या शिक्षेचे आदेश रद्द करत त्यांना संशयाचा फायदा देत हायकोर्टाने सुटकेचे आदेश दिले होते. आपल्या आदेशात हायकोर्टाने म्हटले होते, की दुसऱ्या कोणत्या खटल्यात त्यांना शिक्षा नसेल तर त्यांची सुटका होऊ शकते. 
- सुटकेच्या आधी त्यांना आयपीसी सेक्शन 437 ए चेही पालन करावे लागेल. 
- या कायद्यानुसार, आरोपींना ट्रायल कोर्टासमोर बेल बॉन्ड आणि अनामत रक्कम भरावी लागते. त्यानंतरच तलवार दाम्पत्याची डासना तुरुंगातून सुटका होईल.
शुक्रवारी राजेश तलावारने दुप्पट पेशंट तपासले
- आरुषीच्या माता-पित्यांना शुक्रवारी त्यांची तुरुंगातून सुटका होणार अशी आशा होती. त्यासाठी त्यांनी तुरुंगातील त्यांचे बाड-बिस्तर गुंडाळून ठेवले होते. सोबत 70 पुस्तकांचीही बांधाबांध करुन ठेवली होती. 
- शुक्रवारी सायंकाळी तुरुंग अधिकारी दधिराम मौर्य यांनी त्यांना कळवले की हायकोर्टाच्या आदेशाची प्रत अद्याप मिळालेली नाही. त्यामुळे आता सोमवारीच सुटका होण्याची शक्यता आहे. हे ऐकल्यानंतर राजेश आणि नूपुर तलवार निराश झाले.
- त्याआधी शुक्रवारी दिवसभर दोघेही उत्साहात होते. डॉ. राजेशने रोजच्यापेक्षा दुप्पट पेशंट पाहिले. रोज सकाळी 10 वाजता तुरुंगातील हॉस्पिटलमध्ये पोहोचणारा राजेश शुक्रवारी 8 वाजताच हजर झाला होता. त्याने 44 पेशंट तपासले. 
- कैद्यांना जेव्हा कळाले की डॉ. राजेशची सुटका होणार आहे, तेव्हा अनेक कैदी दंतचिकित्सेसाठी आले होते. 2 कैद्यांचे त्याने ऑपरेशनरही केले. 
- सकाळी 9 ते सायंकाळी 5 दरम्यान तुरुंग अधीक्षकांनी अनेकवेळा राजेश तलवारची भेट घेतली होती.
सशर्त आहे सुटका
- तलवार दाम्पत्याच्या सुटकेचे आदेश हे अलहाबाद हायकोर्टाने दिले आहेत. कोर्टाने त्यांची सशर्त सुटका केली आहे. सीबीआय कोर्टाचे जन्मठेपेच्या शिक्षेचे आदेश रद्द करत त्यांना संशयाचा फायदा देत हायकोर्टाने सुटकेचे आदेश दिले होते. आपल्या आदेशात हायकोर्टाने म्हटले होते, की दुसऱ्या कोणत्या खटल्यात त्यांना शिक्षा नसेल तर त्यांची सुटका होऊ शकते. 
- सुटकेच्या आधी त्यांना आयपीसी सेक्शन 437 ए चेही पालन करावे लागेल. 
- या कायद्यानुसार, आरोपींना ट्रायल कोर्टासमोर बेल बॉन्ड आणि अनामत रक्कम भरावी लागते. त्यानंतरच तलवार दाम्पत्याची डासना तुरुंगातून सुटका होईल.
काय आहे प्रकरण
- मे 2008 मध्ये नोएडाच्या एका घरात आरुषी आणि घरातील नोकर हेमराजचे मृतदेह सापडले होते. गाझियाबादच्या विशेष सीबीआय कोर्टाने या प्रकरणी सुनावणी करुन आरुषीचे आई-वडील नूपुर आणि राजेश तलवार यांना दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. 
- अतिरिक्त सत्र न्यायाधीश श्यामलाल यादव यांनी परिस्थिती जन्य पुराव्यांच्या आधारावर दिल्लीतील प्रसिद्ध दंतचिकित्सक राजेश यांना मुलीच्या हत्येसाठी दोषी ठरवले होते. 
- न्यायाधीश यादव यांनी 28 नोव्हेंबर 2013 ला तलवार दाम्पत्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. 
- 12 ऑक्टोबर 2017 ला अलाहाबाद हायकोर्टाने सीबीआयच्या विशेष न्यायालयाचा निर्णय उलटवला आणि संशयाचा फायदा देत त्यांची सशर्त सुटका केली.

Post a Comment

Top