0
चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीच्या डोक्यात घातला हातोडा; कटरने मान कापली


औरंगाबाद- चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीचा निर्घृण खून केल्याची घटना समोर आली आहे. काल (बुधवारी) रात्री भांडण झाल्यावर दोघे उपाशी झोपले होते. आज (गुरुवारी) पहाटे अडीच वाजेच्या सुमारास मिस्त्री काम करणाऱ्या पतीने हातोड्याने पत्नीचे डोके फोडले, नंतर फरशी कापण्याच्या कटरने तिची मार चिरली. तसेच त्याच कटरने स्वतःचा गळा चिरून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. शहरातील मयूरपार्क मधील मारोती नगरात ही खळबळजनक घटना घडली. हा सर्व प्रकार 10 वर्षीय मुलीने पाहिल्यानंतर उघडकीस आला.
मिळालेली माहिती अशी की, कल्पना हरिओमदास बैनाड,(वय 27) असे मृत पत्नीचे नाव असून हरिओमदास गोविंददास बैनाड, (वय 37) हा जखमी आहे. त्याचीही प्रकृती गंभीर आहे. त्याच्यावर शस्त्रक्रियाही करण्यात आली आहे. तो मिस्त्रीकाम करीत असल्याने हे सर्व साहित्य घरातच होते. हर्सूल ठाण्याचे निरीक्षक मनीष कल्याणकर हे रात्रीपासून घटनास्थळी आहेत.

चारित्र्याच्या संशयारून पती-पत्नीमध्ये नेहमी व्हायचे भांडण
बुधवारी रात्रीही त्यांच्यात जोरदार भांडण झाले. त्यामुळे ये उपशीपोटीच झोपी गेले होते. परंतु, पती हरिओमदास याच्या डोक्यात पत्नीचा काटा काढण्याचा निश्चय पक्का होता. गुरुवारी पहाटे अडीच वाजता तो झोपेतून उठला. आधी त्याने हातोड्याने पत्नीचे डोक्यावर घाव घातला. यानंतर त्‍याने पत्‍नीचे डोके कटरने चिरले. यावेळी झोपेतून उठलेल्या दहा वर्षाच्या त्‍याची मुलगी नेतल हिने वडिलांना पप्पा, पप्पा म्हणून रोखण्याचा प्रयत्न केला. यानंतर मुलीने मामा व आजीला फोन करून घडलेली घटना सांगितली. महिलेच्या भावाने याप्रकरणी पोलिसांना कळवून जखमीला रुग्णालयामध्ये दाखल केले आहे.

Post a Comment

 
Top