0
नारायन राणेंना काँग्रेसने, सडवले आता भाजपवाले कुजवतील: सुभाष देसाईं यांची टीका

रत्नागिरी- ज्यांनी महाराष्ट्र स्वाभिमान नावाचा पक्ष काढला, त्यांचा स्वाभिमान कुठे आहे? गेली बारा वर्षे राणे यांना काँग्रेसने सडवले, आता भाजपवाले कुजवतील, असा टोला शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी लागवला. रत्नागिरीत येथे आयोजित शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते.

शिवसेनाप्रमुखांनी यांनी जी शिवसेना कोकणात उभारली ती आजही कायमस्वरुपी आहे. शिवसेनेची घौडदौड थांबविण्याची कोणामध्ये हिंमत नाही. बाळासाहेब ठाकरे कोंबडी चोर नाव ठेवलेले राणे तुमच्याकडे येत आहेत, तेव्हा भाजपाने आपल्या कोंबडय़ा सांभाळाव्यात, अशी टिका यावेळी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी केली.

शनिवारी रत्नागिरीत शिवसेना पदाधिकऱ्यांचा मेळावा घेण्यात आला होता यावेळी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी नारायन राणे आणि त्यांच्या नव्या पक्षावर जोरदार टीका केली. देसाई म्हणाले, ज्यांना सिंधुदुर्ग जिल्ह्यात थारा नाही, त्यांनी भाजपाला मिठी मारली आहे. सत्तेत असलेल्या पक्षापुढे लोटांगण घेणे त्यांचे कामच आहे. आता महाराष्ट्र स्वाभिमान नावाचा पक्ष काढला आहे. परंतु, त्यांचा स्वाभिमान कुठे आहे? त्यामुळे निवडणूक आयोगाने राणे यांच्या स्वाभिमानाबाबत विचार करावा, असा टोला देसाई यांनी लागवला. शिवसेनाप्रमुखांनी राणे यांना शिवसेनेतून बाहेर काढले, तेव्हा त्यांच्याबरोबर 10 आमदारांनीही शिवसेना सोडली होती. आज ते आहेत कुठे, असा प्रश्न देसाई यांनी उपस्थित केला.

Post a Comment

 
Top