0
शिवसेना पैसे टाकून दळभद्री राजकारण खेळली, हे मी कधीच विसरणार नाही - राज ठाकरे

मुंबई- शिवसेना पैसे टाकून दळभद्री राजकारण खेळली, हे मी कधीच विसरणार नाही असे म्हणत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आपला संताप व्यक्त केला आहे. बाळासाहेबांनी कधीच असे राजकारण शिकवले नाही. त्यांच्या नावावर गलिच्छ राजकारण सूरू आहे. याच घाणेरड्या राजकारणामुळे मी शिवसेना सोडली असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे. ते मुंबई येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

काल मनसेच्या मुंबईतील सातपैकी सहा नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला त्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली प्रतिक्रीया दिली आहे.
आणखी काय म्हणाले राज ठाकरे..?
- पैसे टाकून शिवसेना गलिच्छ राजकारण खेळली.
- फोडाफोडीचे राजकारण बाळासाहेबांनी शिकवले नाही.
- उद्धवच्या निच राजकारणाचा कंटाळा आला आहे.
- दळभद्री राजकारण कधी केले नाही, कधी करणारही नाही.
- उद्धवने केलेले निच राजकारण कधीच विसराणार नाही.
- राज्याशी प्रतरणा करणारे राजकारण मी कधी केले नाही आणि करणारही नाही.
- पाच कोटी रुपये देऊन नगरसेवक घेतले, राज ठाकरे यांचा आरोप.
- शरद पवारांनी फोडाफोडीबद्दल काही बोलू नये..
- जायचे तर छातीठोकपणे जा, पैसे घेऊन कशाला जाता राज ठाकरेंचा शिवसेनेत गेलेल्या नगरसेवकांवर संताप

Post a Comment

 
Top