
इंदूर- दोन वर्षापूर्वी घडलेल्या कविता रैना हत्याकांडच्या केसमध्ये कोर्टात शनिवारी सुनावणी झाली. यात टीआय आणि चौकशी अधिकाऱ्यांना क्रॉस चेक करण्यात आले. आरोपीला संशयीत माणले जात असताना देखील अटक करण्यासाठी अनेक महिने का लागले? असा प्रश्न यावेळी उपस्थित करण्यात आला. आरोपी महेशने ड्रेसचे माप घेण्याच्या बहाण्याने कविताला खोलीत नेले आणि तिथे तिच्यासोबत दुष्कर्म करण्याचा प्रयत्न केला. तिने नकार दिल्याने महेशने तिची हत्या करून मृतदेहाचे सहा तुकडे केले.
कनाडिया रोडवरील मित्रबंधु नगर येथील रहिवाशी कविता रैना 24 ऑगस्ट 2015 रोजी शाळेत मुलाला घेण्यासाठी गेली होती, त्या दिवशीती घरी परतली नाही. तेव्हा नातेवाईकांनी पोलिसात ती बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. तिसऱ्या दिवशी इमली चौकात तिचा साह तुकडे केलेला मृतदेह आढळून आला होता.
या प्रकरणी पोलिसांनी आरोपी महेश बैरागी याला 9 सप्टेंबर 2015 ला अटक केली होती, तो सध्या जेलमध्ये कैद आहे. आरोपीचे वकली चंपालाल यादव यांनी हायकोर्टात याचीका दाखल केली होती. हायकोर्टाने ऑक्टोबर 2016 मध्ये लवकरात लवकर सुनावणी करू निर्णय देण्याचे आदेश दिले होते. परंतु, एक वर्षानंतरही या केसचा निकाल लागला नाही. सध्या या केसची ट्रायल सुरू आहे. शिनिवारी विशेष न्यायाधीश बीके द्विवेदी यांच्या समोर बंवरकुआ ठाण्याचे तत्कालीन प्रभारी राजेंद्र सोनी यांना क्रॉस चेक करण्यात आले. आरोपीला उशीरा अटक करण्यात आल्यावरून यादव यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहे.
निकाल पुढच्या महिण्यात...
एजीपी एनए मंडलोई यांच्या नुसार, या प्रकरणातील एक साक्षिदाराचा जबाब बाकी आहे. त्यानंतर आरोपींचा जबाब होईल आणि कोर्ट निकालाची सुनावणी करेल. नोव्हेंबरच्या शेवटीपर्यंत निकाल येण्याची शक्यता आहे.
Post a Comment