
लखनऊ: पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीपण्णी करणं दाक्षिणात्य अभिनेत प्रकाश राज यांना महागात पडण्याची शक्यता आहे. याप्रकरणी त्यांच्याविरोधात लखनऊ कोर्टात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
याप्रकरणाची सुनावणी 7 ऑक्टोबरला होणार आहे.
‘मोदी माझ्यापेक्षा उत्तम अभिनेते आहेत’ अशा शब्दात सिंघम फेम अभिनेते जयकांत शिकरे म्हणजेच प्रकाश राज यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर घणाघाती टीका केली होती. बंगळुरुमधल्या पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येच्या निषेधार्थ प्रकाश राज यांनी ही टीका केली.
‘मोदी अभिनय करत नाही असं त्यांना वाटत असेल. मात्र, अभिनय काय आणि सत्य काय हे मी चांगलं ओळखतो.’ अशा शब्दात प्रकाश राज यांनी मोदींवर हल्लाबोल केला.
कोण आहेत प्रकाश राज?
प्रकाश राज हे बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेते आहे. बॉलिवूडमधील प्रसिद्ध खलनायक अशी त्यांची ओळख आहे. प्रकाश राज यांनी सलमान खानसोबत वाँटेड आणि दबंग-2, अजय देवगणसोबत सिंघम , संजय दत्तसोबत पोलिसगिरी, अमिताभ बच्चन यांच्यासोबत खाकी यासारखे अनेक बड्या सिनेमांमध्ये त्यांनी काम केलं आहे.
Post a Comment