0
हा बाबा भरवत होता स्वत:चा दरबार, औषध देण्यासाठी महिलांना बोलावून रात्री करायचा असे काहीc

अकोला-तेल्हारा तालुक्यातील पंचगव्हाण गावातील दर्ग्यात राहणाऱ्या एका बाबाने उपचार करण्याच्या नावाखाली एका 19 वर्षीय विवाहित महिलेवर बलात्कार केला. पीडित महिला आपल्या पतीसाठी औषध घेण्यासाठी त्याच्या दरबारात गेली होती. औषध देण्याच्या बहाण्याने त्याने या महिलेला रात्री बोलबून तिच्यावर दोन वेळा बलात्कार केला. पोलिसांनी या ढोंगी बाबास अटक केली असून त्याची चौकशी करण्यात येत आहे.
पीडित महिलेने पतीला सांगितले सत्य
- पोलिस निरीक्षक संतोष केदासेने सांगितले की, दर्ग्यात राहणारा नाहीम बाबा हा ढोंगी बाबा भूत प्रेतांपासून मुक्ती मिळवून देण्याच्या नावाखाली दरबार भरवत होता.
- त्याच्या दरबारात अनेक गावातून लोक येत होते. पीडित महिला आणि तिचा पतीही उपचारासाठी त्याच्या दरबारात गेले होते.
- बाबाने सांगितले की तिच्या पतीवर कोणीतरी काळी जादू केली आहे. ती दूर करण्यासाठी औषधाची गरज आहे.
- ढोंगी बाबाच्या गोष्टी ऐकल्यावर ते नियमितपणे उपचारासाठी त्याच्याकडे जाऊ लागले. बाबा त्याच्याकडे वेळोवेळी पैशाचीही मागणी करत होता.
- गुरुवारी पीडित महिला एकटीच बाबाच्या दरबारात आली होती. रात्री साडेनऊ वाजता बाबाचा दरबार उरकल्यावर ती घरी परतू लागली होती.
- त्याचवेळी बाबा म्हणाला की, तिच्या पतीवरील भूत-प्रेतांचा प्रभाव कमी करण्यासाठी औषधीची गरज आहे. ते आताच बनवावे लागेल.

Post a Comment

 
Top