0नवी दिल्ली- उकळत्या तेलात हात गेला तर काय होईल, हे सर्वांना माहीत आहे. मात्र दिल्लीत राहाणारे 68 वर्षांचे प्रेमसिंह रोज उकळत्या तेलात हात टाकून मासे फ्राय करतात. दिल्लीतील करोल बाग भागात प्रेमसिहं यांचे गणेश रेस्तराँ आहे.

उकळत्या तेलात हात टाकून रोज 100 किलो फिश फ्राय

- प्रेमसिंह रोज 200 डिग्री तापमानात आपल्या हाताने मासळीचे तुकडे टाकतात आणि फ्राय झालेले पिस हातांच्या बोटाने पकडून बाहेर काढतात.
- प्रेमसिंह यांचा उकळत्या तेलासोबतचा हा खेळ 25 वर्षांपासून सुरू आहे. ते दररोज 100 किलो मासे फ्राय करतात.
- प्रेमसिंह सांगतात की या हॉटेलची सुरुवात त्यांच्या वडिलांनी 1960 मध्ये केली होती.
- त्यानंतर प्रेमसिंह या उद्योगाशी जोडलेल गेले आणि त्यांनी मेन्यूमध्ये फ्राय फिशसोबत तंदूरी चिकन, मटन टिक्का आणि अनेक प्रकारचे कबाब यांचा समावेश केला.
- प्रेमसिंह यांचा हा उकळत्या तेलासोबतचा खेळ पाहाण्यासाठी अनेक दिग्गज येऊन गेले आहेत.

Post a Comment

 
Top