भटिंडा - देशद्रोहाच्या आरोपामुळे 6 दिवसांच्या कोठडीत असलेली हनीप्रीत हिला गुरुवारी सकाळी हरियाणा पोलिस भटिंड्याला घेऊन गेले. तेथे पोहोचताच पोलिस स्टेशनपर्यंत जाण्यासाठी पोलिसांना अडचणींचा सामना करावा लागला. वास्तविक, येथे शेकडोंच्या संख्येने लोक हनीप्रीतची एक झलक पाहायला उभे होते. रस्त्यापासून ते पोलिस स्टेशनपर्यंत प्रत्येक जण हातात मोबाइल घेऊन हनीप्रीतची एक झलक टिपण्यासाठी उतावीळ झाला होता.
सारखे-सारखे पाणी मागत होती...
- भटिंडामध्ये हनीप्रीतला सुखदीपच्या घरी नेऊन 2 तास प्रश्न विचारण्यात आले. ती या ठिकाणी 4 दिवस थांबलेली होती. उत्तरात हनीप्रीत म्हणाली - मला आठवत नाही की मी इथं आले होते का? यादरम्यान, ती घाम पुसत राहिली आणि सारखे पाणी मागत राहिली.

हनीप्रीतला भटिंडामध्ये का नेले पोलिसांनी?
- बाबा राम रहीमला 25 ऑगस्ट रोजी बलात्कारप्रकरणी शिक्षा सुनावण्यात आली. तेव्हा हेलिकॉप्टरमधून रोहतक ते जेलपर्यंत हनीप्रीत बाबाच्या सोबत होती. यानंतरच ती गायब झाली. पोलिसांचा संशय आहे की, ती बहुतांश काळ पंजाबच्या मालवा भागत लपून राहिली.
- भटिंड्यात तिने जास्त काळ काढला. येथे तिला सुखदीप कौरने खूप मदत केली.पोलिस चौकशीत हेही कळले की, 4 दिवसांपासून सुखदीपच हनीप्रीतची गाडी चालवत होती. चंदिगडच्या आसपासच्या परिसरात 3 ठिकाणी हनीप्रीत आणि सुखदीप यांनी मुक्काम ठोकला होता.

Post a Comment