
नवी दिल्ली/सूरत - गुजरात विधानसभेचे पडघम वाजायला सुरुवात झाली आहे. अजून निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या नसल्या तरी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांचा दुसरा गुजरात दौरा सुरु आहे. विशेष म्हणजे राहुल गांधींचा अॅक्टिव्ह अंदाज यावेळी पाहायला मिळत आहे. ते शेतकऱ्यांसोबत बोलत आहे, विद्यार्थ्यांशी संवाद साधत आहेत, व्यापारी-उद्योजकांबद्दल बोलत आहे. भाजप सरकारच्या अपयशावर सभा-बैठकांमधून हल्लाबोल करत असतानाच सोशल मीडियावरुनही राहुल गांधी हिंदी आणि इंग्रजीतून सक्रिय राहात आहेत. त्यांच्या प्रत्येक सभा संमेलनाची माहिती त्यांची टीम सोशल मीडियावर सुत्रबद्धरितीने प्रमोट करत आहे. या डिजिटल कँपेनची जबाबदारी सांभाळत आहे दिव्या स्पंदना. दिव्याला बहुतेकजण साऊथची अॅक्ट्रेस राम्या या नावाने ओळखतात.
कोण आहेत राम्या...
- साऊथची 34 वर्षीय अॅक्ट्रेस दिव्या स्पंदना उर्फ राम्याने 2012 मध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.
- अॅक्ट्रेस राम्या यांनी 2013 मध्ये कर्नाटकातील मंड्या लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक लढली आणि त्या संसदेत पोहोचल्या.
- त्यांनी जेडीएसचे उमेदवार सीएस पंट्टाराजू यांचा पराभव केला होता. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत मात्र मोदी लाटेत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला.
- राम्या यांचे दिव्या @Divya Spandana/Ramya नावाने ट्विटर अकाऊंट आहे. त्यांना ट्विटरवर 5 लाख 44 हजार पेक्षा जास्त लोक फॉलो करतात.
- कन्नड चित्रपटातून डेब्यू करणाऱ्या राम्या यांनी तेलगू, तामिळ चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे.
'विकास वेडा झाला' कँपेन
- माजी खासदार राम्या सोशल प्लॅटफॉर्म फेसबुक, ट्विटर, व्हॉट्स अॅपवर येताच काँग्रेसमध्ये कमालीचा बदल झालेला पाहायला मिळत आहे.
- गुजरात दौऱ्यात राहुल गांधींनी भाजपवर टीका करताना म्हटले होते, 'विकास पागल झाला आहे'. राहुल यांचे हेच वाक्य काँग्रेसच्या डिजिटल टीमने कॅच केले आणि याचे जोरदार कँपेन करण्यात आले. 'विकास पागल झाला' हे वाक्य आता प्रत्येक भाषेतून भाजपवर बरसत आहे.
- वास्तविक हे वाक्य गुजराती भाषेतून होते. 'गोडो थई छो' असे हे वाक्य होते, अर्थात 'विकास पागल झाला आहे'. एका 20 वर्षीय सागर सावलिया नावाच्या मुलाने गुजरात बसच्या खराब आवस्थेवर फेसबुकवर हे वाक्य टाकले होते. तेव्हापासून काँग्रेसच्या सोशल मीडिया टीमने भाजपविरोधातील प्रचारात याचा वापर केला आहे.
-'विकास पागल झाला आहे', या वाक्याने ट्विटर, फेसबुक आणि सोशल मीडियाच्या विविध प्लॅटफॉर्मवर विरोधकांनी भाजपवर निशाणा साधण्यासाठी याचा पुरेपूर वापर सुरु केला आहे.
राम्या आयटी सेलच्या प्रमुख
- लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर काँग्रेसने आपल्या सोशल मीडिया स्ट्रॅटेजीमध्ये महत्त्वपूर्ण बदल केले होते.
- या बदलाचा सर्वात मोठा भाग म्हणजे खासदार दीपेंद्र सिंह हुड्डा यांच्या ऐवजी सोशल मीडियावर लाखो फॉलोअर्स असलेल्या राम्या यांना आयटी सेलची जबाबदारी देण्यात आली.
- सोशल मीडियावरील विविध प्लॅटफॉर्मवर पक्षाला मजबुतीने प्रेझेंट करण्यासाठी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींनी हा निर्णय घेतला होता.
- तीन वेळा काँग्रेस खासदार राहिलेले हुड्डा जवळपास 5 वर्षांपासून आयटी सेल व सोशल मीडिया टीमची धुरा वाहात होते.
- राहुल गांधी यांनी केलेला बदल पक्षाला ऊर्जा देणार ठरत असल्याचे मानले जात आहे.
Post a Comment