0


कीटकनाशक फवारणीमुळे बळी गेलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना दोन लाख रुपयांची मदत मुख्यमंत्र्यांनी जाहीर  केली असली आणि केंद्र सरकारकडून आणखी मदत देण्याचे आश्वासन केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी दिले असले तरी अजूनही लालफितशाहीच्या जोखडात अडकडलेल्या प्रशासनापायी एकाही शेतकरी कुटुंबाच्या हाती एक छदामही पडलेला नाही, हे कटू वास्तव समोर आले आहे. मदतीअभावी विषबाधाग्रस्त शेतकरी-शेतमजुरांची दैन्यावस्था झाली आहे.
सातबारा असलेला शेतकरी आणि नसलेला अर्थात शेतमजूर असा फरक करून सातबारा असलेल्या शेतकऱ्याला गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात मदत योजनेतून दोन लाख रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, ज्यांच्याजवळ सातबारा नाही अशा मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्यांच्या बाबतीत निर्णय घ्यायलाच सरकारने कालापव्यय केला. अखेर मुख्यमंत्री निधीतून अशा शेतकऱ्यांना देखील दोन लाख रुपये देण्याचा निर्णय शासनाने घेतल्याची माहिती येथे जिल्हा प्रशासनाने दिली. विशेष हे की, यवतमाळ जिल्हयात फवारणीचे २० बळी गेले आहेत. त्यापकी १३ शेतकरी सातबारा उताराधारक असून सातजण शेतमजूर आहेत. यांना कधी पसे मिळणार  या प्रश्नाचे उत्तर लवकरात लवकर त्यांच्या खात्यात आम्ही पैसे टाकू असे देण्यात येत आहे.

Post a Comment

 
Top