0
तेलकट खाद्यपदार्थ वृत्तपत्रात बांधून देण्यावर बंदी घालण्याची शिवसेनेची मागणी; ‘ग्राफाइट’ घातक

मुंबई- तेलकट खाद्यपदार्थ पेपरमध्ये गुंडाळून देण्यावर बंदी घालण्याची मागणी शिवसेनेचे नगरसेवक आशिष चेंबूरकर यांनी महापालिकेकडे केलेली आहे.
शाईत ‘ग्राफाइट’ नावाचा अत्यंत विषारी घटक
वर्तमानपत्रांच्या छपाईसाठी वापरण्यात येणाऱ्या शाईत ‘ग्राफाइट’ नावाचा अत्यंत विषारी घटक असतो. हा विषारी घटक कागदात गुंडाळलेल्या वडापाव, भजीसह इतर खाद्यपदार्थांत शोषून घेतला जातो. यामुळे आरोग्याला धोका संभवतो, असे त्यांनी म्हटले आहे.
खाद्यपदार्थ वृत्तपत्राच्या कागदांमध्ये गुंडाळून विक्री न करता ती मिल्क पेपर किंवा टिशू पेपरच्या माध्यमातून करावी अशी मागणी चेंबूरकर यांनी केली आहे.

Post a Comment

 
Top