0

All the 6 corporators from MNS are with us, claims Shivsenaमनसे सोडून शिवसेनेत गेलेल्या सहा नगरसेवकांपैकी चार नगरसेवकांनी पुन्हा मनसेत येण्याची इच्छा व्यक्त केली आहे, असा दावा मनसेने केला आहे.

मुंबई : मनसेतून आलेले सर्व सहा नगरसेवक शिवसेनेसोबतच आहेत, असा दावा पक्षातर्फे करण्यात आला आहे. शिवसेना यासंदर्भात आज प्रसिद्धीपत्रक काढणार आहे.
मनसे सोडून शिवसेनेत गेलेल्या सहा नगरसेवकांपैकी चार नगरसेवकांनी पुन्हा मनसेत येण्याची इच्छा व्यक्त केली आहे, असा दावा मनसेने केला आहे. या नगरसेवकांशी संपर्क झाला असून त्यांच्याशी चर्चा सुरु आहे, तसंच या नगरसेवकांनी राज ठाकरे यांच्याशी चर्चा केली आहे, असंही मनसेकडून सांगण्यात आलं आहे.
या वृत्तानंतर शिवसेनेच्या गोटात खळबळ माजली. त्यानंतर शिवसेनेने हे वृत्त फेटाळत, मनसेतून आलेले सहाही नगरसेवक एकत्र असून ते आमच्यासोबतच असल्याचं स्पष्टीकरण दिलं.
मनसेचे सहा नगरसेवक शिवसेनेत
काही दिवसांपूर्वी 13 ऑक्टोबरला मनसेचे 7 पैकी 6 नगरसेवक शिवसेनेते गेले होते. त्यामुळे मुंबई महापालिकेतील शिवसेनेचं संख्याबळ वाढलं होतं. मात्र त्यापैकी परमेश्वर कदम, हर्षला मोरे, दत्ताराम नरवणकर, अर्चना भालेराव यांनी मनसेशी संपर्क साधल्याचं सांगितलं जात आहे.
मनसेचे नगरसेवक फोडून भाजपला शह
भांडुप पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या पराभवानंतर भाजप बरीच आक्रमक झाली होती. ‘लवकरच मुंबईत आमचा महापौर बसवू.’ असं वक्तव्य भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केले होतं. भाजपच्या संभाव्य खेळी लक्षात घेऊन शिवसेनेनं तात्काळ एक भन्नाट चाल खेळत मनसेच्या तब्बल 6 नगरसेवकांना फोडलं होतं.
या सर्व घडामोडीत शिवसेनेचे आमदार अनिल परब आणि महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. मात्र याबाबत मनसेने कोकण आयुक्तांकडे तक्रार केली होती.
मुंबई महापालिकेतील मनसेचे नगरसेवक :
अर्चना भालेराव – वॉर्ड 126
परमेश्वर कदम – वॉर्ड 133
अश्विनी मतेकर- वॉर्ड 156
दिलीप लांडे – वॉर्ड 163
संजय तुर्डे – वॉर्ड 166
हर्षला मोरे – वॉर्ड 189
दत्ताराम नरवणकर- वॉर्ड 197
वॉर्ड क्र. 166चे संजय तुर्डे सोडता सहाही नगरसेवक हे शिवसेनेसोबत गेले आहेत.
मुंबई महापालिकेतील पक्षीय बलाबल = 227
शिवसेना अपक्षांसह – 84 + 4 अपक्ष = 88
भाजप अभासे आणि एक अपक्षासह – 83+अपक्ष 2= 85
कॉंग्रेस – 30
राष्ट्रवादी कॉंग्रेस – 9
मनसे – 7
सपा – 6
एमआयएम – 2

संबंधित बातम्या :

शिवसेनेत गेलेले 4 नगरसेवक पुन्हा मनसेत परतणार?

7 नगरसेवक, 13 आमदार ते मनसेकडे उरलेला एकटा नगरसेवक

पहिल्या मास्टरस्ट्रोकनंतर शिवसेनेची तात्काळ दुसरी खेळी!

शिवसेनेचा मास्टरस्ट्रोक, मनसेचे सहा नगरसेवक सेनेसोबत

मनसेची साथ न सोडणारा एकमेव नगरसेवक कोण?

मॉकड्रीलचं कारण देत मुंबई महापालिकेच सर्व दरवाजे बंद!

करोडो देऊन शिवसेनेकडून नगरसेवकांची खरेदी, सोमय्यांचा गंभीर आरोप

दगाफटका योग्य नाही, नगरसेवकांवर राज ठाकरे भडकले

‘लवकरच मुंबईत आमचा महापौर’, सोमय्यांचं शिवसेनेला आव्हान

Post a Comment

 
Top