
नाशिक - दिवाळीची खरेदी करण्याबरोबरच सणाचा आनंद लुटण्यासाठी कारखानदारांसह आस्थापनांनी कामगारांना दिवाळीपूर्वीच बोनस देत दिवाळी गोड करावी, असे आवाहन सहायक कामगार आयुक्त किशोर दहिफळकर यांनी केले आहे. या आशयाचे पत्रकच कारखानदारांना देण्यात आले आहे.
हिंदू धर्मातील सर्वात मोठा सण म्हणून दिवाळी सणाकडे बघितले जाते. सर्वसाधारणपणे ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात दिवाळीचा सण येतो. औद्योगिक वसाहतीत कारखानदार तसेच, विविध आस्थापनांकडून कामगारांना दिवाळीपूर्वीच बोनस देण्याचा प्रघात आहे. दिवाळीपूर्वी मिळणाऱ्या बोनसमधून कामगारांच्या कुटुंबीयांची दिवाळी साजरी होत असते. बोनस अधिनियमांतर्गत सुधारित तरतुदीनुसार जिल्ह्यातील कारखानदार, आस्थापनांनी त्यांच्याकडे कार्यरत कामगारांना १० ते १२ दिवस अगोदरच बोनस देत त्यांचा आनंद द्विगुणित करावा, असे आवाहन सहायक कामगार आयुक्त किशोर दहिफळकर यांनी पत्रकाद्वारे कारखानदार तसेच, आस्थापनांना केले आहे.
सीटू संलग्न कारखान्यांमध्ये यशस्वी करार : सीटू संलग्न काही कारखान्यांमध्ये बाेनसचे यशस्वी करार झाले अाहेत. त्यामुळे तीन-चार दिवसांत कामगारांच्या हातात बाेनसची रक्कम मिळाल्यानंतर बाजारपेठा फुलण्यास सुरुवात हाेईल.
Post a Comment