
बार्शी-लग्नाचे आमिष दाखवून वेळोवेळी महिला पोलिस कॉन्स्टेबलवर दुष्कर्म केल्याप्रकरणी व जबरदस्तीने दोनवेळा गर्भपात केल्याप्रकरणी एका पोलिसासह अन्य पाच जणांवर बार्शी शहर पोलीसांत गुन्हा दाखल झाला आहे.
संदीप सुंदरराव पाटील (रा.वाकडी, ता.परंडा, सध्या रा.बार्शी ) असे अाराेपी पोलिसासह विकास दादासाहेब पाटील, सुंदरराव दादासाहेब पाटील, यशवंत गोवर्धन पाटील, काशीदबाई व अन्य एक अनोळखीवर गुन्हा दाखल झाला आहे. पीडित घटस्फोटित महिलेशी सलगी वाढवून संदीप पाटील याने तिला वेळोवेळी लग्नाचे आमिष दाखवून विविध ठिकाणी दुष्कर्म केले. यातून ती पीडीत महिला गर्भवती राहिली. त्यावेळी परांडा येथील एका हॉस्पीटलमध्ये पाटीलसह त्याचे नातेवाईक व इतरांनी बळजबरीने गर्भपात करण्यास भाग पाडले. त्यानंतरही बहिणींचे लग्न झाल्यानंतर लग्न करू असे आमिष दाखवून दुष्कर्म केले. दुसऱ्यावेळी कर्नाटकातील विजापूर जिल्ह्यात बळजबरीने पुन्हा तिचा गर्भपात केला, अशा आशयाची फिर्याद पीडित महिला कॉन्स्टेबलने दिली आहे.
Post a Comment