
क्वालालंपूर- चार देशांच्या पाचव्या टून अहमद सरर्जी चषक क्रिकेट स्पर्धेत भारताच्या मुंबई क्रिकेट क्लबने उपविजेतेपद मिळवले. साखळीमध्ये अजिंक्य राहिलेल्या मुंबई सीसीला अंतिम फेरीत बांगलादेशच्या कालाबागन संघाकडून एका विकेटनी मात खावी लागली. मुंबई सीसीचे ९८ धावांचे आव्हान गाठताना कालाबागनच्या विकेट ठराविक अंतराने पडल्याने चुरस कायम राहिली.
शशी कदमसह (१३ धावांत ४ विकेट) वेदांत पाटीलने (१४ धावांत २ विकेट) अचूक मारा करताना विजयासाठी प्रयत्न केले. मात्र तळातील फलंदाजांनी त्यांचे प्रयत्न फोल ठरवले. तत्पूर्वी, सचिन यादवमुळे (३६ धावा) मुंबई सीसीला शंभराच्या घरात पोहोचता आले. कालाबागन संघातर्फे सय्यद मोहम्मद अली (१५ धावांत ६ विकेट) सर्वात प्रभावी ठरला.
Post a Comment