0
मोदींना तीन वर्षांचा हिशेब मागण्यापूर्वी राहुल गांधींनी तीन पिढ्यांचा हिशेब द्यावा- शहा


वडोदरा/ अमेठी -भाजप आणि काँग्रेस यांच्यात सध्या जोरदार वाक््युद्ध सुरू आहे. काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी मंगळवारी गुजरातमधून भाजपवर, भाजपाध्यक्ष अमित शहा, केंद्रीय मंत्री स्मृती इराणी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अमेठीतून राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका केली.
गुजरात दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी भाजपाध्यक्ष अमित शहा यांचे पुत्र जय शहा यांच्या बहाण्याने पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल केला. ते चौकीदार आहेत की भागीदार, असे त्यांनी मोदींना अप्रत्यक्षपणे संबोधले. तर, शहा म्हणाले, “मोदींना तीन वर्षांचा हिशेब मागणाऱ्या राहुल गांधींनी आधी अमेठीतील आपल्या तीन पिढ्यांच्या विकासाचा हिशेब द्यावा. राहुल यांचा चष्मा इटालियन असल्याने त्यांना काही दिसत नाही. याउलट येथून पराभूत झालेल्या स्मृती इराणी या ठिकाणी विकासाच्या योजना आणत आहेत.’ या वेळी स्मृती इराणी यांनीही राहुल गांधींवर टीका केली. त्या म्हणाल्या, गुजरातमध्ये जाऊन विकासाची चेष्टा करण्यापूर्वी राहुल गांधी यांनी अमेठीचा विकास करावा. राजीव गांधी फाउंडेशनच्या नावाखाली एका सायकल कारखान्याची जमीन हडपण्याचा प्रयत्न सुरू आहे, असा आरोप आदित्यनाथ यांनी केला.
राहुल यांनी अमेठीचे तुकडे केले, आता विकासाची चेष्टा करत आहेत : शहा
देश आणि उत्तर प्रदेशावर राहुल गांधी यांचे पणजोबा, आजी आणि वडिलांनी राज्य केले. त्यांनी ७० वर्षांचा हिशेब द्यावा. अमेठीत सुमारे ४० वर्षांपासून त्यांच्याच कुटुंबातील सदस्य खासदार असूनही इतकी दुर्दशा का? या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालय, टीबी रुग्णालय, एफएम रेडिओ स्टेशन का बनवले नाहीत? गोमती नदीवर धरण का बांधले नाही? मोदी-योगी यांच्या सरकारनंतरच अमेठीचा विकास झाला. 
- विकासाचे दोन मॉडेल आहेत. एक गांधी-नेहरू मॉडेल आणि दुसरे मोदी मॉडेल. पहिल्या मॉडेलने काही लोकांचा विकास करण्यात आला. दुसऱ्याने सर्वांच्या विकासाची व्यवस्था केली. गुजरातमध्ये प्रत्येक घरी वीज, पाणी, आरोग्य केंद्र आणि अन्य सुविधा आहेत. राहुल यांनी अमेठीचे तुकडे केले आणि आता गुजरातच्या विकासाची चेष्टा करत आहेत. 
- राहुल गांधींना कदाचित माहीत नाही की, मोदी सरकारने तीन वर्षांत गरीब, युवा, महिला आणि समाजातील वंचितांसाठी १०६ योजना आणल्या. त्यांना कदाचित १०६ पर्यंत मोजता येत नसेल म्हणून प्रश्न विचारतात.

Post a Comment

 
Top