
मुंबई- दादर माटुंगा येथे सांस्कृतिक सभागृहात 'स्वरकुल ट्रस्ट' या सामाजिक संस्थेतर्फे 'जागतिक अंध दिना'च्या निमित्त 'दिव्यदृष्टी दाता' पुरस्कार प्रदान करण्यात आला. या सोहळ्यात अंध, अपंग कलाकार आणि त्यांच्यासाठी निस्वार्थ काम करणार्या अनेक सामाजिक संस्था आणि व्यक्तिंना हा पुरस्कार देण्यात आला. या प्रसंगी 'स्वरकूल ट्रस्ट'च्या वतीने अंध कलाकारांच्या सुरेल वाद्यवृंदाचा कार्यक्रम येथे सादर करण्यात आला.
माझे सुंदर डोळे मी जाताना दान करेन- मानसी
'स्वरकुल'च्या या कार्याने भारावून गेलेल्या प्रमुख अतिथी सुप्रसिद्ध सिनेतारका मानसी नाईक हिनेही नेत्रदानाचा संकल्प केला आहे. मनोगत व्यक्त करताना ती म्हणाली की, "मी मोठ्या डोळ्यांची मानसी म्हणून रसिकांची लाडकी आहे. हे माझे सुंदर डोळे मी जाताना दान करेन!" आलेल्या समस्त अतिथींचे सोनुसोंग रायटर सिंगर अजय व भाग्येश्री शिरसागर जागतिक क्रीडापटू मुग्धा लेले आणि मानसी नाईक यांचे वीणा जींनी आभार मानले.
या संपूर्ण सोहळ्याचे आयोजन,दिग्दर्शन आणि सूत्रसंचालन 'स्वरकुल ट्रस्ट' च्या अध्यक्षा डाॅ.वीणा त्यागराज यांनी केले.
या संपूर्ण सोहळ्याचे आयोजन,दिग्दर्शन आणि सूत्रसंचालन 'स्वरकुल ट्रस्ट' च्या अध्यक्षा डाॅ.वीणा त्यागराज यांनी केले.
Post a Comment