0

कल्पना रवींद्र खिल्लारे असे मृत महिलेचे नाव असून ती औरंगाबादच्या सातारा परिसरातील रहिवासी आहे.

जालना-एकतर्फी प्रेमप्रकरणातून औरंगाबाद येथील महिलेची जालन्यात गळा चिरुन हत्या करण्यात आली. ही घटना काल (बुधवारी) रात्री घडली. कल्पना रवींद्र खिल्लारे असे मृत महिलेचे नाव असून ती औरंगाबादच्या सातारा परिसरातील रहिवासी आहे. विशेष म्हणजे ती पतीसोबत चारचाकी गाडीतून प्रवास करीत असताना आरोपीने त्यांची गाडी थांबवून तिची हत्या केली.

याप्रकरणी कदीम जालना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी एका संशयीतास ताब्यात घेतले आहे.


याप्रकरणी मृत कल्पना यांचे पती रवींद्र खिल्लारे यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, बुधवारी रात्री 10 वाजेच्या सुमारास ते इंडीका (एम.एच.20 सी.एच.6450) मधून जात असताना आरोपी सचिन सुपारकर याने त्यांची गाडी अडवली. त्यानंतर त्यांच्या पत्नी कल्पना यांना बाजुला नेऊन माझे तुझ्यावर प्रेम होते, तू त्याच्यासोबत लग्न का केले? असा सवाल करत कल्पनाच्या गळ्यावर तिक्ष्ण हत्याराने वार केले. यात गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला.

दरम्यान, शहरात 15 दिवसांपूर्वीच नितीन कटारिया या व्यापाऱ्याचा अशाच प्रकारे तिक्ष्ण हत्याराने वार करुन खून करण्यात आला होता. त्यापाठोपाठ ही घटना घडल्याला खळबळ उडाली अाहे. दरम्यान रवींद्र खिल्लारे यांनी त्यांच्या फिर्यादीत नमूद केल्यानुसार पोलिसांनी संशयीत आरोपी सचिन सुपारकर यास ताब्यात घेतले आहे.

Post a Comment

 
Top