0
31 ऑक्टोबरला देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधींची हत्या झाली होती. (फाइल)

नवी दिल्ली -इंदिरा गांधींना आपल्या मृत्यूचा पूर्वाभास झाला होता? ओडिशा (तेव्हाचे उडिसा) ची राजधानी भुवनेश्वरमध्ये अचानक त्यांनी जे वेगळे भाषण दिले, त्यावर या बाबीला बळ मिळते. 
भाषणामुळे लोक झाले होते चकित...
- भुवनेश्वरमध्ये 30 ऑक्टोबर 1984 रोजी दुपारी इंदिरा गांधींनी जे भाषण दिले होते, त्या भाषणाला त्यांचे सल्लागार एच. वाय. शारदाप्रसाद यांनी तयार केले होते. भाषणाच्या मध्येच त्यांनी लिहिलेले भाषण वाचण्याऐवजी वेगळेच बोलायला सुरुवात केली होती.
- त्या म्हणाल्या होत्या, "मी आज येथे आहे. उद्या कदाचित येथे नसेन. मला मी राहील वा नाही याची चिंता नाही. माझे आयुष्य दीर्घ राहिले आणि मला याचा गर्व आहे की मी माझे पूर्ण आयुष्य आपल्या लोकांच्या सेवेत घालवले. मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत असे करत राहीन आणि जेव्हा मला मृत्यू येईल, तेव्हा माझ्या रक्ताचा एकेक थेंब भारताला मजबूत करण्यासाठी कामी येईल."
- त्यांच्या या भाषणामुळे लोक अवाक् झाले होते. स्वत: त्यांच्याच पक्षाचे लोक समजू शकले नाही की, इंदिराजींनी असे शब्द का वापरले?
हत्येनंतर राजीव बनले होते पीएम...
9 नोव्हेंबर 1917 रोजी जन्मलेल्या इंदिरा गांधींनी भारताला इंटरनेटवर नवी ओळख दिली. कोणत्याही परिस्थिती दोन हात करण्याची क्षमता असणाऱ्या इंदिरांनी इतिहासात स्वत:च्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला, त्याचबरोबर पाकिस्तानची शकले करून दक्षिण आशियाचा नकाशाच बदलून टाकला.
- त्यांच्या शासनकाळात अनेक चढ-उतार आले, परंतु 1975 मध्ये आणीबाणी लागू करण्याचा निर्णयामुळे त्यांना विरोध पत्करावा लागला होता. त्या 16 वर्षांपर्यंत पंतप्रधान राहिल्या.
- त्या भारताच्या अशा निवडक मुत्सद्दी नेत्यांपैकी होत्या, ज्यांनी कडक निर्णय घ्यायला कधीच मागेपुढे पाहिले नाही. मग तो आणीबाणी लागू करण्याचा निर्णय असेल, वा ऑपरेशन ब्ल्यू स्टारच्या आदेशाचा. त्यांनी एका ठिकाणी, मी निराश होऊन गुडघे टेकणाऱ्यांपैकी नसल्याचे म्हटले होते. इंदिरा गांधींच्या हत्येनंतर त्यांचा मुलगा राजीव गांधी देशाचे पंतप्रधान बनले.
खुनी म्हणाले- आम्हाला जे करायचे होते, ते आम्ही केले...
- उडिसामध्ये निवडणूक प्रचारसभेनंतर इंदिरा गांधी 30 ऑक्टोबरच्या संध्याकाळी दिल्लीला पोहोचल्या. दुसऱ्या दिवशी म्हणजे 31 ऑक्टोबरच्या सकाळी 9 च्या सुमारास इंदिराजी एक अकबर रोडकडे चालत गेल्या. वेगवान पावले टाकत इंदिराजी सफदरजंग रोडला एक अकबर रोडला जोडणाऱ्या गेटजवळ 11 फूट अंतरावर पोहोचल्या.
- गेटजवळ सब इन्स्पेक्टर बेअंत सिंग तैनात होता. ठीक बाजूला असलेल्या बूथमध्ये कॉन्स्टेबल सतवंत सिंग आपल्या स्टेनगनसह ड्यूटीवर उभा होता.
- पुढे चालत इंदिराजी बूथजवळ गेल्या. बेअंत आणि सतवंतला हात जोडून इंदिराजींनी स्वत: नमस्कार केला. तेवढ्यात बेअंत सिंगने अचानक आपल्या उजव्या बाजूने सरकारी रिव्हॉल्व्हर काढली आणि इंदिरांवर गोळी झाडली. आसपासचे लोकांना धक्का बसला. पुढच्याच क्षणी बेअंत संगने दोन आणखी गोळ्या इंदिराजींच्या पोटावर झाडल्या. यानंतर त्या जमिनीवर कोसळल्या.
- अचानक बूथवर उभ्या सतवंतने एकानंतर एक गोळ्या झाडायला सुरुवात केली. एका मिनिटात त्याने आपल्या स्टेनगनची पूर्ण मॅगझिन इंदिराजींवर रिकामी केली. 30 गोळ्यांमुळे इंदिराजींच्या शरीराची चाळणी झाली होती.
- बेअंत सिंगने आर. के. धवनकडे पाहून म्हटले- आम्हाला जे करायचे होते, ते आम्ही केले. आता तुम्हाला जे करायचे आहे, ते करा.
- त्या वेळी जवळ उभ्या असलेल्या एसीपी दिनेशचंद्र भट्ट यांनी त्वरित बेअंत आणि सतवंतला पकडले. त्यांचे हत्यार जमिनीवर पडले. मग त्यांना जवळच्याच खोलीत नेण्यात आले.

Post a Comment

 
Top