0

Image result for theft


मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकांच्या वेळी आम्ही तिजोरी उघडी करुन दिली होती, आता चोरी करायची गरज का पडली ? असा सवाल मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी केला आहे.
मुंबई महापालिका निवडणुकांच्या वेळी मनसेने दिलेला प्रस्ताव शिवसेनेने स्वीकारला नाही. त्यावेळी तिजोरी उघडी करुन दिली होती, मग आता चोरी करायची गरज का पडली? असा सवाल देशपांडे यांनी उपस्थित केला. शिवसेनेने मराठी माणसाच्या पाठीत खंजीर खुपसला असल्याची टीकाही संदीप देशपांडेंनी केली.
मनसेच्या सहा नगरसेवकांनी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत अधिकृत पक्षप्रवेश केला. मुंबईतील ‘मातोश्री’ या निवासस्थानावर त्यांनी हे शिवबंधन बांधलं. अर्चना भालेराव (वॉर्ड 126), परमेश्वर कदम (वॉर्ड 133), अश्विनी मतेकर (वॉर्ड 156), दिलीप लांडे (वॉर्ड 163), हर्षल मोरे  (वॉर्ड 189), दत्ताराम नरवणकर यांनी सेनाप्रवेश केला.
मुंबई महापालिकेत मनसेची साथ न सोडणारा एकमेव नगरसेवक संजय तुर्डे यांनी आपण मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी प्रामाणिक असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.
मुंबई महापालिकेतील मनसेच्या सात पैकी सहा नगरसेवकांना पक्षात सामील करुन उद्धव ठाकरेंनी एका दगडात दोन पक्षी मारले. या मास्टरस्ट्रोकमुळे मुंबई महापालिकेत सत्ता स्थापन करण्याची स्वप्न पाहणाऱ्या भाजपच्या मनसुब्यांना शिवसेनेने सुरुंग लावला.
‘लवकरच मुंबईत आमचा महापौर बसवू.’ असं वक्तव्य भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केले होतं. भाजपच्या संभाव्य खेळी लक्षात घेऊन शिवसेनेनं तात्काळ एक भन्नाट चाल खेळत मनसेच्या तब्बल 6 नगरसेवकांना फोडलं. या सर्व घडामोडीत शिवसेनेचे आमदार अनिल परब आणि महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

Post a Comment

 
Top