मुंबई- पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकांना भुलवून सत्ता मिळवली आहे. मात्र, आता चुकीचे काम करत आहेत. लोकशाहीत सरकारे येतात आणि जातात. मात्र, देश व जनता तीच असते. त्यामुळे देशातील न्यायाधिश, निवडणूक आयोग, नोकरशहा, संपादक व पत्रकारांनी मोदींच्या चुकीच्या धोरणांना विरोध करावा असे आवाहन मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी केले.
मागील आठवड्यात 29 सप्टेंबर रोजी एलफिन्स्टन-परेल रेल्वे पुलावर चेंगराचेंगरी होऊन 23 जणांचा मृत्यू झाला होता. तर 50 हून अधिक लोक जखमी झाले होते. यानंतर राज ठाकरेंनी रेल्वेच्या समस्यांबाबत आपला राग व्यक्त करण्यासाठी मोर्चा काढण्याचे जाहीर केले होते.
त्यानुसार आज (गुरुवारी) दुपारी रेल्वे प्रवाशांच्या न्याय हक्कांसाठी सरकार व रेल्वे प्रशासनावर राग व्यक्ती करण्यासाठी मेट्रो सिनेमा ते रेल्वे मुख्यालय चर्चगेट असा संताप मोर्चा काढला. रेल्वे मुख्यालयात रेल्वे प्रशासनाला निवेदन दिल्यावर राज ठाकरे यांनी चर्चगेट येथेच एक छोटेखानी सभा घेतली. त्यावेळी राज ठाकरे बोलत होते. यावेळीही राज ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला. भाषणाच्या शेवटी चेंगराचेंगरीत मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांना सार्वजनिक श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

राज ठाकरे म्हणाले, मुंबईतील लोक किड्या-मुंग्यासारखी रेल्वे प्रवासात मरत आहेत. काँग्रेसने काही केले नाही म्हणून यांना निवडून दिले तर यांनी वेगळाच कार्यक्रम सुरु केला. त्यामुळेच माझा भाजप सरकारवर राग आहे. केंद्रातील भाजप सरकार थापा मारत व खोटी आश्वासने देऊन सत्तेत आले आहे. त्यांच्याकडून आतापर्यंत एकही आश्वासन पूर्ण झाले नाही. नरेंद्र मोदी थापाडे आहेत. मोदींच्या भूमिकांना, धोरणांना विरोध केला की आम्हाला देशद्रोही ठरवले जाते. शेतकरी, कामगारांना देशोधडीला लावण्याचे काम सुरु आहे. आर्थिक मंदी आली तरी ते मान्य करत नाहीत. उलट ऊठ-सूठ भाषण टोकण्याचे काम पंतप्रधान करत आहेत. टीव्ही लावला तरी यांचे भाषण आणि रेडिओ लावला तरी यांची मन की बात. फक्त यांचेच ऐकायचे, आम्ही काही बोललो की देशद्रोही ठरवले जातेय असे सांगत भाजपवर सडकून टीका केली.
लोकल रेल्वेला पायाभूत सुविधा देण्याची गरज व्यक्त करत राज ठाकरे म्हणाले, मुठभर गुजराती लोकांसाठी बुलेट ट्रेनचा घाट घातलाय, त्यात कोणीच बसणार नाही याची मोदींना कल्पना आहे. सुरेश प्रभूंनी बुलेट ट्रेनला विरोध केला म्हणून त्यांना रेल्वेमंत्रीपदावर हटवले. मध्य व पश्चिम रेल्वे पुलावरील फेरीवाले 15 दिवसात हटवा नाहीतर माझी माणसे ते हटवतील. त्यानंतर झालेल्या संघर्षाला माझा पक्ष व कार्यकर्ते जबाबदार राहणार नाहीत. देशात अनेक चुकीच्या गोष्टी घडत असून, देशभरातील नोकरशहा, न्यायमूर्ती, निवडणूक आयोग, संपादक व पत्रकारांनी मोदींच्या धोरणाला विरोध करा असे जाहीर आवाहनही राज यांनी केले. सरकारे येतात व जातात. त्यामुळे देशाचे वाटोळं करणा-या मोदींच्या निर्णयाला जनतेने नेटाने विरोध केला पाहिजे असेही राज यांनी सांगितले.
Post a Comment