0
जॅक्स कॅलिस आपला 43 वा वाढदिवस साजरा करत आहे.स्पोर्ट्स डेस्क - दक्षिण अफ्रिकेचा माजी स्टार क्रिकेटर जॅक्स कॅलिस 16 ऑक्टोबर रोजी आपला 43 वा वाढदिवस साजरा करत आहे. जगातील बेस्ट ऑल राउंडर्सपैकी तो एक आहे. टेस्ट आणि वनडे फॉरमॅटमध्ये 10 हजारांहून अधिक धावा काढून 250 पेक्षा अधिक विकेट्स घेणारा तो जगातील एकमेव क्रिकेटर आहे.
>> जॅक्स कॅलिस पर्सनल लाइफमध्ये दिलफेक माणूस म्हणून ओळखल्या जातो. त्याचे अफेअर अनेक तरुणींशी असले तरीही 3 महिलांसोबतचे त्याचे अफेअर चर्चेत होते. 
>> 2002 मध्ये त्याने माजी मिस साऊथ अफ्रिका सिंडी नेल हिला डेट केले. दोघांनी एंगेजमेंट देखील केली. मात्र, 9 महिन्यातच त्यांचा ब्रेक-अप झाला. 
>> नेलशी दूर होताच 2003 मध्ये त्याने मिस साउथ अफ्रिका फर्स्ट रनरअप मेरिसा एगली हिला डेट केले. वर्षभरातच हे दोघे वेगळे झाले. 
>> 2007 मध्ये कॅलिसच्या आयुष्यात आणखी एक मॉडेल शेमोन जार्डिमची एंट्री झाली. 6 वर्षे सोबत राहिल्यानंतर 2013 मध्ये दोघांनी वेगळ्या वाटा धरल्या. 
>> यानंतरही त्याच्या आयुष्यात किम रिवालंड नामक मॉडेलने एंट्री घेतली. ती सुद्धा मिस अर्थ साउथ अफ्रीका 2011 होती. IPL 7 मध्ये या दोघांना एकत्रित पाहण्यात आले होते. यानंतर ते दोघे वेगळे झाले. 
>> एवढे ब्रेक-अप झाल्यानंतर 2014 मध्ये चार्लेन एंजेल्सच्या संपर्कात आला. तेव्हापासून हे दोघे सोबत राहत आहेत. त्यांना एका वर्षाची मुलगी आहे.

बहिण होती चिअरलीडर
>> कॅलिसच्या वडिलांना 2003 मध्ये कॅन्सर असल्याचे निष्पन्न झाले. याच आजारामुळे त्यांचे निधन झाले. तेव्हा कॅलिसने क्रिकेटमधून मोठा ब्रेक घेतला होता. 
>> कॅलिसला आपल्यापेक्षा 5 वर्षांनी लहान एक बहिण आहे. जेनिन कॅलिस असे तिचे नाव असून ती प्रोफेशनल फिजियोथेरेपिस्ट आहे. लंडनमध्ये राहणारी जेनिनला डान्सिंगचा छंद आहे. हे स्वप्न साकारण्यासाठी तिने चिअरलीडर म्हणून काम देखील केले आहे. 
>> 2009 IPL च्या वेळी जेनिन चिअरलीडर म्हणून भारतात आली होती. एका इंटरव्यूमध्ये तिने सांगितले होते, की तिला नाचण्याचा छंद आहे. आपल्याविषयी कोण काय बोलत आहे याचा विचार ती करत नाही.

Post a Comment

 
Top