0

चंदिगड - सलमान खानची बहीण अर्पिताचे सासरे हिमाचल प्रदेश सरकारमधील मंत्री अनिल शर्मा भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर अनिल शर्मा म्हणाले की, सलमान खान त्यांच्यासाठी रोड शो करणार आहेत. वास्तविक, सलमान खानची बहीण अर्पिता खानचे ते सासरे आहेत. आयुष शर्मा आणि अर्पिताचे लग्न 18 नोव्हेंबर 2014 रोजी झाले होते. त्यांच्या रिसेप्शनमध्ये पूर्ण खान कुटुंब चंदिगडच्या मंडी येथे आले होते.
माजी केंद्रीय मंत्री सुखराम यांचे पुत्र आहेत अनिल...
- हिमाचल प्रदेशचे ग्रामीण विकास, पंचायत राज व पशुपालन मंत्री अनिल शर्मा माजी केंद्रीय मंत्री सुखराम यांचे पुत्र आहेत.
- हिमाचलमध्ये 18 नोव्हेंबर रोजी निवडणुकीची घोषणा झालेली आहे. निवडणुकीच्या वातावरणात अनिल शर्मा यांनी भाजप प्रवेश करून काँग्रेसला मोठा धक्का दिला आहे.
- त्यांनी भाजप प्रवेश करताच सलमान खाने अनिल शर्मा यांच्यासाठी मंडीमध्ये एक रोड शो करण्याची इच्छा जाहीर केली आहे.
- रोड शोबद्दल सलमानचे अनिल शर्मा यांच्याशी फोनवर बोलणेही झाले आहे. सलमान खान मंडीमध्ये अनिल शर्मा यांच्यासाठी कोणत्या दिवशी शो करतील, हे अजूनही ठरले नाही.
वडलांच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी सोडली काँग्रेस...
- शर्मा यांनी आपल्या फेसबुक वॉलवर लिहिले की 'हिमाचल प्रदेश मंत्रिमंडळातून राजीनामा देऊन मी भाजपचे सदस्यत्व स्वीकारले. मोदींचे स्वप्न साकार करण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहील.
- अनिल शर्मांचे म्हणणे आहे की, दीर्घ काळापासून त्यांच्या कुटुंबाला दुर्लक्षित करण्यात आले होते. यामुळे मजबुरीने त्यांना हे पाऊल उचलावे लागले.
- अनिल शर्मा म्हणाले की, काँग्रेसमध्ये दीर्घकाळापासून माझा आवाज दबलेला होता.
- राहुल गांधी यांच्या मंडी रॅलीदरम्यान त्यांचे वडील पंडित सुखराम यांचा विरोध करण्यात आला होता.
- यामुळेच ते त्या रॅलीत सामील झाले नव्हते. यानंतर निवडणुकीला घेऊन गठित समितीतही त्यांना आणि पंडित सुखराम यांना कोणतीही जागा मिळाली नाही.
- शनिवारी पंडित सुखराम यांनी स्वत: काँग्रेसचे प्रदेश प्रभारी सुशीलकुमार शिंदे यांची दिल्लीत भेट घेतली आणि नाराजी व्यक्त केली. परंतु तेथेही त्यांना समाधानकारक उत्तर मिळाले नाही.
- यानंतर त्यांनी भाजप प्रवेशाचा निर्णय घेतला.

Post a Comment

 
Top