
इंटरनॅशनल डेस्क - आपल्या चित्रपटांसाठी तब्बल 300 ऑस्कर नॉमिनेशन आणि 81 ऑस्कर पुरस्कार मिळवलेला निर्माता हार्वे वीनस्टीनवर ऑस्कर बोर्डाने आजीवन बंदी लावली आहे. ब्रिटनचे सर्वोच्च चित्रपट पुरस्कार मंडळ BAFTA ने यापूर्वीच वीनस्टीनवर प्रतिबंध लावले आहेत. 25 वर्षांच्या कारकिर्दीत 10 अभिनेत्रींवर बलात्कार आणि असंख्य अभिनेत्रींवर बलात्काराचा प्रयत्न केल्याचे आरोप या प्रोड्युसरवर लावण्यात आले आहे. तो बाफटा आणि ऑस्कर्स या दोन्ही मंडळांच्या ज्युरीचा सदस्य होता. यापुढे त्याला आयुष्यात कधीही पुरस्कार किंवा सदस्यत्व मिळणार नाही.
>> कामाच्या ठिकामी महिलांवर बळजबरी आणि त्यांचे शोषण करणाऱ्यांवर दुर्लक्ष करता येणार नाही. हे प्रकरण अतिशय गंभीर असून समाजात अशा लोकांना काहीच स्थान नाही. अशा प्रकारचे वर्तन करणाऱ्या लोकांना आम्ही घेतलेला निर्णय एक संदेश आहे असे ऑस्कर्स पुरस्कार मंडळाने स्पष्ट केले आहे.
>> एंजेलिना जोली, ग्विनेथ पॅल्ट्रो, एव्हा ग्रीन आणि असंख्य महिलांनी शूटिंगच्या ठिकाणी या निर्मात्यावर छेडछाड आणि बलात्काराच्या प्रयत्नांचा आरोप लावला आहे. तर 10 हून अधिक महिलांनी त्याच्यावर पोलिसांत बलात्काराचा आरोप दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास ब्रिटिश आणि अमेरिकन पोलिस करत आहेत. तसेच 2000 हून अधिक लोकांची चौकशी करण्यात आली आहे.
Post a Comment