0
पंचवटीतील महिलेचा स्वाईन फ्लूमुळे मृत्यू, बळींची संख्या 66

नाशिक - माेठ्या प्रमाणात स्वच्छता माेहीम राबवल्यानंतरही शहरात डेंग्यू स्वाईन फ्लू नियंत्रणात येत नसून उद्रेक पंचवटी परिसरातील ४७ वर्षीय महिलेचा स्वाईन फ्लूमुळे बळी गेल्याचे समाेर अाले अाहे. त्यामुळे स्वाईन फ्लू बळींची संख्या ६६ झाली अाहे.
गेल्या वर्षीच्या तुलनेत डेंग्यू स्वाईन फ्लूची तीव्रता कमी असली तरी, संकट कायम अाहे. दरम्यान, स्वाईन फ्लूमुळे मेहरधाम येथील ज्योती मधुकर पगारे यांचा मृत्यू झाला अाहे. त्यांच्यावर पंचवटीतीलच एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. तपासणी अहवालात स्वाईन फ्लूचे निदान झाले अाहे. आतापर्यंत जानेवारी ते ऑक्टोबर २०१७ या कालावधीत तब्बल ४४७ जणांना स्वाईन फ्लूची लागण झाली आहे. यामध्ये महापालिका क्षेत्रातील २३२ जणांचा, तर पालिकाबाह्य क्षेत्रातील २१५ जणांचा समावेश आहे. यापैकी अातापर्यंत ६६ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये महापालिका क्षेत्रातील २९, तर बाह्य क्षेत्रातील ३७ जण आहेत. एकंदरीतच ही अाकडेवारी पाहता स्वाईन फ्लूने शहरात पाय पसरले असल्याचे दिसून येते.
सहा दिवसांत १०० डेंग्यू संशयित 
गेल्या सहा दिवसांत डेंग्यू संशयित १०० रुग्ण आढळले असून त्यांचे रक्तनमुने जिल्हा शासकीय प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. त्यापैकी ६४ जणांच्या तपासणी अहवालात १६ जणांना डेंग्यूची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

Post a Comment

 
Top