0


भोपाळ/बैतूल -आपल्या मित्राला भेटायला आलेल्या तरुणीला 4 जणांनी मारहाण करून सामूहिक बलात्कार केला. एवढ्यावरच ते थांबले नाहीत, त्यांनी तरुणी आणि तिच्या मित्राचा अश्लील व्हिडिओही बनवला. यादरम्यान, तरुणीचा मित्र तिला सोडून पळून गेला. ही घटना एमपीच्या बैतूलमध्ये घडली.
 
असे आहे प्रकरण...
- महाराष्ट्रातील कळमेश्वरमधील सवंद्री गावातील 20 वर्षीय नर्सिंगच्या विद्यार्थिनीला बुधवारी दुपारी अडीच वाजता हसलपूरच्या रामटेक टेकडीवर 4 तरुणांनी मारहाण करून सामूहिक बलात्कार केला. तरुणीला मजबूर करून तिचा अश्लील व्हिडिओही बनवला. घटनेच्या 20 तासांनी पोलिसांनी विद्यार्थिनीच्या तक्रारीवरून आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. संशयाच्या आधारे पोलिसांनी अर्धा डझन तरुणांना ताब्यात घेतले आहे. दुसरीकडे पीडितेला मेडिकल चेकअपसाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.
 
मुलगी म्हणाली...
- पीडित विद्यार्थिनीने पोलिसांना सांगितले की, कुटखेडी गावातील सोनू यादवशी तिची 2 वर्षांपासून ओळख आहे. बुधवारी ती नागपूर पॅसेंजरने सोनूला भेटायला आमला येथे आली होती. येथे सोनू तिची वाट पाहत होता. दोघेही हसलपूर येथील रामटेक टेकडीवर गेले. मंदिरात बसून आपसात बोलत होते. दुपारच्या वेळी दोन जण आले आणि त्यांनी मारहाण सुरू केली. ते म्हणाले- तुम्ही दोघं इथं 'त्या' कामासाठी आलात. आम्ही समजावले तरी त्यांनी ऐकले नाही आणि फोन करून आणखी दोघांना बोलावून घेतले. चौघांनी मिळून सोनूला बेदम मारहाण केली. तरुणांनी मुलीच्या पर्समधून 130 रुपये आणि बॅग तसेच सोनूचे पैशांचे पाकीट  आणि मोबाइलही हिसकावला.
 
काय म्हणतात पोलिस?
- पोलिस अधिकारी विशाल चौरसिया यांच्या मते, चौघांपैकी आरोपी राकेश बेलेवर आमला पोलिस स्टेशनमध्ये पूर्वीच लूटमार, छेडछाड, मारहाणीसह 6 गुन्हे दाखल आहेत. तरुणीचे काही नातेवाइक कुटखेडी गावात राहतात. तिचे येथे नेहमी येणे-जाणे असल्याने तिची सोनूशी दोन वर्षांपासून ओळख होती. 
 
धमकावून बनवला अश्लील व्हिडिओ
- मारहाण आणि लूटमार करून चौघा नराधमांनी मुलगा आणि मुलीचा बळजबरी करून मोबाइलवर अश्लील व्हिडिओ बनवला. यानंतर व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली. व्हिडिओ बनवल्याबरोबरच सोनू पळून गेला. यानंतर नराधमांनी आळीपाळीने तरुणीवर बलात्कार केला. तरुणीने म्हटले की, कशीबशी तेथून मी जीव वाचवून पळाले तेव्हा वाटेत एक जण भेटला. त्याने आरोपींची नावे हसलपूरमध्ये राहणारे राकेश बेले, सागर बेले, तरुण बेले आणि लवकुश अशी सांगितली.

Post a Comment

 
Top