
श्रीनगर - दहशतवाद्यांनी बॉर्डर सिक्युरिटी फोर्स (बीएसएफ) कॅम्पवर आज (मंगळवार) सकाळी 3:45 वाजता हल्ला केला. वृत्तसंस्थेकडून मिळालेल्या माहिती नुसार एअरफोर्स स्टेशन आणि श्रीनगर विमानतळाजवळ हा हल्ला केला आहे. तीन ते चार दहशतवाद्यांनी हा हल्ला केल्याचा अंदाज वर्तवन्यात असून, एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात आला आहे. आज सकाळी जोरदार फायरिंग आणि प्रचंड स्फोट ऐकायला आल्याचे अधिका-यांनी सांगितले.
अधिका-यांनी सांगितले की, तीन ते चार आत्मघाती हल्लेखोरांनी हल्ला केला यात बीएसएफचे चार जवान या हल्ल्यात जखमी झाले असून एक दहशतवादी ठार झाला असण्याचा अंदाज आहे.
Post a Comment