0


विवस्त्रावस्थेत पळून तरुणीने वाचवला जीव, 3 दिवस बांधून प्रियकर अन् त्याच्या मित्रांनी केले असे काही

रामगड (झारखंड) - येथे गोला थाना परिसरात एका प्रियकराने त्याच्या प्रेयसीला भेटायला जंगलात बोलावले. तरुणी तेथे पोहोचताच प्रियकराने मित्रांसह मिळून तिला बांधून तीन दिवस तिच्यावर गँगरेप केला. नराधमांच्या तावडीतून मुश्किलीने तरुणीने नग्नावस्थेतच पळून आपला जीव वाचवला. गावात पोहोचल्यावर गावकऱ्यांनी तिला कपडे दिले.
तरुणीने सांगितली पूर्ण हकिगत...
- पीडितेने अगोदर गावकऱ्यांना घटनेची माहिती दिली. मग पोलिसांना कळवण्यात आले. पीडितेने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
- पीडितेने सांगितल्यानुसार, मागच्या दीड वर्षापासून तिचे मधुराम बेदियाशी प्रेमसंबंध सुरू होते. 
- बेदियाने तीन दिवस अगोदर तिला फोन करून जायंतीबेडाच्या जंगलात लग्न करू म्हणून बोलावून घेतले. प्रियकराच्या म्हणण्यावर विश्वास ठेवून ती त्या जागेवर पोहोचली.
- तिथे अगोदरच घात लावून बसलेला प्रियकर मधुराम आणि त्याचे दोन मित्र रूपलाल बेदिया आणि राजेशने तिला पकडले. त्यांनी जंगलात 3 दिवस विवस्त्र बांधून तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. 
- यानंतर नराधमांनी या घटनेला वाचा फुटू नये म्हणून तिला जिवे मारण्याचाही प्रयत्न केला. पण तरुणीने कसाबसा तिथून पळ काढून स्वत:चा जीव वाचवला. 
- तरुणी नग्नावस्थेतच जायंतीबेडा गावात पोहोचली. गावकऱ्यांनी तरुणीला कपडे दिले आणि पोलिसांना कळवले.
- रामगडचे एसपी किशोर कौशल यांनी सांगितले की, पोलिसांनी गावात पोहोचून तरुणीचा प्रियकर आणि दोन साथीदार रूपलाल बेदिया आणि राजेश महतोला अटक केली आहे. पुढील कारवाई सुरू आहे.

Post a Comment

 
Top