0
लग्नाला झालते 3 महिने, पतीच्या मृत्यूनंतर विधवा भावजयीसोबत दिराने केले असे काही

लखनऊ - खोटे वारसाहक्क दस्तऐवज तयार करण्याच्या आरोपात पोलिसांनी श्याम बहार गुटखा कंपनीचा तथाकथित मालक राहुल मिश्रा याला मंगळवारी अटक केली आहे. त्याच्याविरुद्ध अनेक गुन्हे दाखल होते. वॉरंटही जारी झाले होते. याप्रकरणी पोलिस खूप दिवसांपासून त्याचा शोध घेत होती. तथापि, राहुल श्याम बहार पानमसाला कंपनीचा पाया रचणाऱ्या संजीव मिश्राचा भाऊ आहे. संजीवची विधवा पत्नीने फसवणूक करून संपत्ती हडपल्याचा आरोप केला आहे.
असे आहे पूर्ण प्रकरण...
- संजीव मिश्राचा मृत्यू फेब्रु. 2014 मध्ये झाला होता. मृत्यूच्या 3 महिने आधीच संजीवचे लग्न इटावाच्या राहणाऱ्या मीनाक्षी यांच्याशी झाले होते.
- मीनाक्षींचा आरोप आहे की, पतीच्या मृत्यूनंतर दीर राहुलने त्यांना घराबाहेर काढले. यानंतर प्रॉपर्टीची खोटी वसीयत बनवून आपल्या नावे केली.
- या कामात रजिस्ट्रार ऑफिसचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनीही त्याची साथ दिली. या खोट्या दस्तऐवजांच्या आधारावर त्यांनी संजीवची खूप संपत्तीही विकली होती.
- श्याम बहार गुटख्याचा ट्रेडमार्क राहुलने चुकीच्या अॅफिडेव्हिटने ताब्यात घेतले. मला फसवणुकीची माहिती कळताच मी उच्च अधिकाऱ्यांना तक्रार केली. यावरून पोलिसांत तक्रारही दाखल आहे.
- कोर्टाकडून याप्रकरणी वॉरंटही जारी करण्यात आले होते.
अनेक महिन्यांपासून पोलिस शोध घेत होते
- अटक झालेला राहुल अनेक दिवसांपासून फरार होता. अनेक महिन्यांपासून लपून तो सारखी जागा बदलून राहत होता.
- वीजरगंजचे पोलिस अधिकारी पंकज सिंह म्हणाले की, राहुलला अटक करण्यात आली असून पुढील कारवाई सुरू आहे.

Post a Comment

 
Top