0
आज महाराष्ट्रातील सुमारे 3131 गावांचे थेट सरपंच निवडले जातील.

मुंबई- राज्यातील 16 जिल्ह्यातील 3 हजार 131 ग्रामपंचायत निवडणुकीचे आज निकाल लागणार आहेत. पहिल्यांदाच थेट सरपंच निवडले जात असल्याने या नव्या पॅटर्नमध्यो लक कसे मतदान करतात याकडे सर्वांचे लक्ष आहे. रविवारी झालेल्या ग्रामपंचायतीच्या पहिल्या टप्प्यातील निवडणुकीत सरासरी 80 टक्क्यांच्या घरात मतदान झाले आहे. दरम्यान, पुढील आठवड्यात 16 ऑक्टोबर रोजी दुस-या टप्प्यातील सुमारे 4 हजारांहून अधिक ग्रामपंचायतींत थेट सरपंच पदासह सदस्यपदाच्या निवडीसाठी मतदान होईल.
कोणत्या जिल्ह्यात किती सरपंच आज निवडणार?-
जिल्हा जागा
नाशिक 150
धुळे 96
जळगाव 101
नंदुरबार 42
अहमदनगर 194
औरंगाबाद 196
बीड 655
नांदेड 142
परभणी 126
जालना 221
लातूर 324
हिंगोली 46
अकोला 247
यवतमाळ 80
वाशिम 254
बुलडाणा 257
एकूण 3131

Post a Comment

 
Top