
पुणे -भरधाव डंपरने दुचाकीला उडवल्याने तरुणी जागीच ठार झाल्याची घटना येरवड्यातील शास्त्रानीगर येथे शनिवारी सकाळी घडली. भाग्यश्री रमेश नायर (२५,रा.वडगावशेरी,पुणे) असे मृत तरुणीचे नाव अाहे. याप्रकरणी येरवडा पाेलिसांनी डंपर चालक सागर चाैगुले याला अटक केली अाहे. भाग्यश्री ही तरुणी एका खासगी बँकेत नाेकरी करत हाेती. तसेच महाराष्ट्र लाेकसेवा अायाेग (एमपीएससी) परीक्षेची तयारी करत हाेती. शनिवारी सकाळी ती कुटुंबीयांना तुळजापूर येथे जाण्यासाठी तिकीट घेऊन येत हाेती. या वेळी शास्त्रीनगर येथील चाैकात सिग्नलला पाठीमागून अालेल्या डंपरने तिच्या दुचाकीला धडक दिली. यामुळे भाग्यश्रीचा ताेल जाऊन ती रस्त्यावर पडली व तिच्या डाेक्यावरून डंपरचे चाक गेले. यात तिचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर नागरिकांनी डंपर चालक चौगुले याला बेदम मारहाण करून पोलिसांच्या ताब्यात दिले.
Post a Comment