0
मोदी 24 दिवसांत तिसऱ्यांदा गुजरातेत, राहुल गांधींची हिमाचलमध्ये पहिली सभा, राज्‍यांत निवडणुका

द्वारका- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी २४ दिवसांत तिसऱ्यांदा गुजरात दौरा केला. अनेक विकासकामांचा शिलान्यास केला. द्वारकेतील मोजबमध्ये देशातील पहिली सागरी पोलिस प्रशिक्षण संस्था सुरू करण्याची घोषणा केली. जीएसटीतील बदलामुळे देशात १५ दिवस आधीच दिवाळी आल्याचे ते म्हणाले. काँग्रेस सरकारे जागी व्हावीत म्हणून प्रयत्न केले, परंतु शक्य झाले नाही, अशी टीकाही केली. काही वेळाने राहुल गांधी यांनी मंडीत सभा घेतली. ते म्हणाले, मोदी फकीर आहेत. खऱ्या-खोट्याचा त्यांना फरक पडत नाही.

जीएसटी लागू केल्यानंतरच सांगितले होते की ३ महिन्यांनी आढावा घेऊ, अडचणी असतील तर सोडवू : मोदी
मी आज पेपरमध्ये हेडलाइन पाहिली की जीएसटीतील बदलांमुळे म्हणे १५ दिवस आधीच दिवाळी आली... तीन महिन्यांनी अडचणी दूर केल्या. व्यापाऱ्यांना मी लालफितीचा कारभार, सरकारी बाबूंच्या फेऱ्यात अडकू देणार नाही.

यूपीएने किनाऱ्याचा विकास केला नाही
यूपीएने किनाऱ्याच्या विकासाला प्राधान्य दिले नाही. १६०० किमी सागरी सीमा असलेल्या या राज्यात नीलक्रांतीमध्ये देशाचे नेतृत्व करण्याची क्षमता आहे. त्यासाठी स्वप्न बाळगावे लागते.

सीएम टाकीचे उद्घाटन करत
काँग्रेसचे माजी सीएम माधवसिंह सोळंकी पाण्याच्या टाकीचे उद्घाटन करण्यासाठी जामनगरला आले होते. ते फोटो वृत्तपत्रांत पहिल्या पानावर येत. आता विकासाची व्याख्या बदलली आहे.

नवोन्मेषाचे आव्हान देतो
आपल्याकडे नैसर्गिक बुद्धिमत्ता आहे. आयटीवर प्रभुत्व आहे. असे असूनही गुगल-फेसबुक आणि यू-ट्यूब का पुढे आहेत? म्हणूनच मी तरुणांना नवोन्मेषाचे आव्हान देतो.

ताफा थांबवून मित्राची घेतली भेट : नरेंद्र मोदी द्वारकाधीशाचे दर्शन घेऊन निघाले इतक्यात त्यांना हरिभाई आधुनिक हा आपला जुना मित्र दिसला. मोदींनी ताफा थंाबवला. सुरक्षा कडे तोडून हरिभाईला भेटले. मुख्यमंत्री होण्यापूर्वी मोदी द्वारकेत हरिभाई यांच्याकडेच मुक्कामी असत.

राहुलचा पलटवार - चीनमध्ये रोज ५० हजार नोकऱ्या, येथे फक्त ४५०
माणूस बोलण्यापूर्वी विचार करतो. मोदीजींना मात्र खरे काय, खोटे काय फरक पडत नाही. मंत्री पीयूष गोयल म्हणतात, कमी नोकऱ्या चांगल्या. हे लाजिरवाणे आहे. चीनमध्ये रोज ५० हजार रोजगार, तर भारतात केवळ ४५० हजार रोजगार आहेत. केंद्र अपयशी ठरले आहे.

गुजरातपेक्षा हिमाचल प्रदेश मॉडेल चांगले
गुजरात मॉडेलच्या मोदी देशभर बाता करतात. मात्र, हिमाचलमध्ये ५ वर्षांत ७० हजार नाेकऱ्या मिळाल्या. गुजरातने १० हजार नोकऱ्या दिल्या, १३ हजार शाळा बंद केल्या. सातव्या वेळीही राज्यात वीरभद्रसिंह यांचेच काँग्रेस सरकार सत्तेत येईल.

मोदीजी चप्पलने २५ हजार फूट चढतात...
पत्रकाराने विचारले, मोदीजी आपण किती उंचीपर्यंत गेलात? मोदीजी म्हणाले, चप्पल घालून २५ हजार फूट. भारतात कांचनगंगा इतके उंच आहे. ते सर करताना जीवच जातो. मोदी तर चप्पलनेच शिखर चढले.

Post a Comment

 
Top