गांधीनगर- भारतीय जनता पक्षाच्या गौरव महासंमेलनात सहभागी होत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेस भ्रष्टाचारात बुडालेला पक्ष असल्याची टीका केली. भाजपसाठी निवडणूक एक यज्ञ असतो असे सांगत अमित शहांच्या नेतृत्वात पक्षाने देशाच्या प्रत्येक ठिकाणी विजयी पताका फडकवली असल्याबद्दल त्यांचे कौतूक केले. लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशमधील निकाल सर्वांना थक्क करणारे होते. आता तिथे विधानसभाही जिंकली आहे. तेव्हा आता तुम्ही 2019 ची चिंता सोडा आणि 2024 वर लक्ष केंद्रीत करा, असे मोदी म्हणाले. त्याआधी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी ट्विटरवरुन मोदींवर तिरकस टिप्पणी केली. ते म्हणाले, की आज गुजरातमध्ये आश्वासनांची बरसात होणार.
मोदी दुपारी अहमदाबादला पोहोचले. येथून ते गांधीनगरमधील भाट गावात गेले. येथे ते गौरव यात्रेच्या समारोपात सहभागी झाले. या कार्यक्रमात जवळपास 7 लाख लोक सहभागी झाले असल्याचा अंदाज आहे. या कार्यक्रमात मुख्यमंत्री विजय रुपाणी आणि अमित शहा उपस्थित आहेत.
आणखी काय म्हणाले मोदी
#1 गुजारतची निवडणूक आली की त्यांचा ज्वर वाढतो
- मोदींनी काँग्रेसवर निशाणा साधला. ते म्हणाले, 'ज्या पक्षाने एका कुटुंबातील इतक्या सदस्यांना नेतेपद दिले, त्या पक्षाची भाषा एवढी खालच्या स्तराला जाऊ शकते ? याचे काय कारण आहे. त्यांना सकारात्मक विचार सोडले असून नकारात्मक विचारांचा स्वीकार केला आहे.'
- 'जेव्हा-जेव्हा गुजरात निवडणूक येते त्यांना ज्वर चढत असतो. त्यांच्या डोळ्यांमध्ये गुजरात खुपत असते. या पक्षाने वल्लभभाई आणि मणिबेन पटेल यांच्यासोबत काय व्यवहार केला. मोरारजी देसाईंबद्दल का प्रचार केला. ते काय पितात आणि काय पित नाही. मोराजीभाईंना नेस्तनाबूत करण्यासाठी काय-काय केले नाही.'
#2 मी मुख्यमंत्री असताना काय-काय नाही केले
- मोदी म्हणाले, बाबूभाई जसभाईंचे सरकार यांनी फोडले होते. गुजरातवाल्यांना प्रथम बळी चढवतात. माधवभाई सोलंकींना बोफोर्स प्रकरणात घरी पाठवले होते. हे कुटुंब आणि हा पक्ष एकही संधी सोडत नाही. मी मुख्यमंत्री होतो. काय-काय षडयंत्र रचले गेले. त्यांनी विचारल केला की जोपर्यंत अमित शहांना तुरुंगात टाकत नाही तोपर्यंत मोदींना तिथे पाठवू शकत नाही.
- सरदार सरोवरचा प्रकल्पामुळे ते चिडलेले आहेत. गुजरातच्या पोरा-सोरांना माहित आहे की नर्मदेसाठी आम्ही काय-काय बलिदान दिले आहे.

3 काम करणे काँग्रेसच्या स्वभावात नाही
- मोदी म्हणाले, एकाही नदीवर ते धरण बांधू शकले नाही. आम्ही योजना सुरु केल्या. काँग्रेसच्या सरकारमध्ये 40 वर्षांपासूनचे प्रकल्प रखडून पडलेले होते. त्यांच्या स्वभावात काम करणेच नाही.
- मी गुजरातमध्ये होतो तेव्हा नागरिकांसोबत थेट संवाद करत होतो. दिल्लीतही सचिवांशी थेट मुलाकात होते. जुने प्रकल्प काढायला सांगतो. संसदेत ते मंजूर करुन घेतले. 40 वर्षात हे प्रकल्प तसेच पडलेले होते. 12 लाख कोटींचे प्रकल्प सुरु केले.

#4 विकासाच्या मुद्यावर काँग्रेसने पळ काढला
- मोदी म्हणाले, विकासाच्या मुद्दयावर काँग्रेसने निवडणूक लढावी अशी माझी इच्छा होती. मात्र ते या मुद्द्यावर पळ काढतात. जातियवाद आणि इतर मुद्दे उपस्थित करतात. मला आशा आहे की काँग्रेस विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवेल. मात्र ते होत नाही.

#5 नेहरु ज्योतीसंघाच्या कार्यक्रमात आले होते, वारंवार जनसंघ म्हणत होते
- पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, पंडित नेहरु ज्योतीसंघाच्या कार्यक्रमात आले होते. लोक सांगतात की ते वारंवार ज्योती संघ विसरुन जनसंघाचे नाव घेत होते. भाजपमुळे यांचा थरकाप होणे स्वाभाविक आहे. यांनी आम्हाला कधी गांधींचा हत्यारा म्हटले. कधी शहरी पार्टी म्हटले. आम्हाला दलित विरोधी म्हटले गेले. आज सर्वाधिक दलित खासदार आमच्या पक्षात आहेत. जेव्हा सर्व निष्प्रभ झाले तेव्हा यांनी विकासालाच शिव्या देण्यास सुरुवात केली.
- गावातील लोकांना रस्ते पाहिजे नाही का? गावातील मुलांना शाळा नको का? हा विकास नाही का? असा सवाल मोदींनी उपस्थित केला.

182 विधानसभा जागा, 149 मतदारसंघातून गेली गौरव यात्रा
- 1 ऑक्टोबरपासून सुरु झालेली गुजरात गौरव यात्रा 15 दिवसांमध्ये राज्यातील 182 मतदारसंघांपैकी 149 मतदारसंघातून गेली.
- गौरव यात्रेने 15 दिवसांमध्ये 4471 किलोमीटर प्रवास केला.
- भाजपचे अनेक केंद्रीय मंत्र्यांसह उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडचे मुख्यमंत्रीही या यात्रेत सहभागी झाले होते.

महिन्याभरात चौथ्यांदा मोदी गुजरातला
- गेल्या एक महिन्यात (साधरणतः 32 दिवसांत) मोदींचा हा चौथा गुजरात दौरा आहे.
- याआधी 14 सप्टेंबरला त्यांनी जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांच्यासोबत अहमदाबादमध्ये बुलेट ट्रेनची कोलनशिला ठेवली होती.
- त्यानतंर 17 सप्टेंबरला स्वतःच्या वाढदिवसानिमित्त मोदी राज्याच्या दौऱ्यावर आले होते.
- 7 ऑक्टोबरला ते दोन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर होते. तेव्हा राजकोट, वडनगर आमि गांधीनगर येथे अनेक प्रकल्पांचे भूमिपूजन केले होते. काही योजनांचे लोकार्पणही मोदींने केले.
- 8 ऑक्टोबरला मोदी त्यांचे गाव वडनगर येथेही गेले होते. याभागात त्यांनी रोड शो केला होता.
Post a Comment