0
आयोगाच्या मागणीनंतर गेल्या महिन्यात केंद्र सरकारने 15,400 कोटी रुपयांचा निधी आयोगाला दिला आहे.

भोपाळ - लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकाच वेळी घेण्याची निवडणूक आयोगाची तयारी आहे. सप्टेंबर 2018 पर्यंत या दोन्ही निवडणुका एकत्र घेता येऊ शकतात, तशी आम्ही तयारी करु शकतो. मात्र आगामी निवडणुका एकत्र घ्यायच्या की नाही हे सरकारला ठरवावे लागेल, असे निवडणूक आयुक्त ओ.पी. रावत म्हणाले.
सरकारने आयोगाला दिले 15400 कोटी रुपये
- ओ.पी. रावत बुधवारी भोपाळमध्ये म्हणाले, एकत्र निवडणुका होण्यासाठी कोण-कोणत्या गोष्टींची आवश्यकता आहे, कोणते रिसोर्सेस लागतील याची विचारणा केंद्र सरकारने आयोगाकडे केली होती. आयोगाच्या मागणीनंतर गेल्या महिन्यात केंद्र सरकारने 15,400 कोटी रुपयांचा निधी आयोगाला दिला आहे.
40-40 लाख ईव्हीएम आणि व्हीव्हीपीटी मशिनची आवश्यकात
- रावत म्हणाले, दोन्ही निवडणुका एकत्र घेण्यासाठी जवळपास 40-40 लाख ईव्हीएम मशिन आमि तेवढेच व्हीव्हीपीटी मशिनची आवश्यकता आहे. आयोगाने दोन कंपन्यांना हे काम दिले आहे. 
- मध्यप्रदेशातील आगामी पोट निवडणुकीबद्दल त्यांना विचारण्यात आले त्यावर येत्या 6 महिन्यात या निवडणुका होतील असे रावत म्हणाले. 
- गुजरात आणि हिमाचल प्रदेशातील विधानसभांच्या तारखांविषयी विचारले असता रावत म्हणाले, 'दोन्ही राज्यातील निवडणुकांची तयारी पूर्ण झाल्यानंतर तारखा घोषित केल्या जातील.'

Post a Comment

 
Top