0



रांची-यजमान टीम इंडियाने वनडेपाठाेपाठ अाता घरच्या मैदानावर अाॅस्ट्रेलियाविरुद्धची टी-२० मालिका जिंकण्याच्या माेहिमेला शनिवारी दमदार सुरुवात केली. भारताने रांचीच्या मैदानावर सलामीच्या सामन्यात अाॅस्ट्रेलियावर मात केली. डकवर्थ लुइसच्या नियमानुसार भारताने ९ गड्यांनी सामना जिंकला. यासह भारताने तीन टी-२० सामन्यांच्या मालिकेत १-० ने अाघाडी घेतली. अाता मालिकेतील दुसरा सामना मंगळवारी गुवाहाटीच्या मैदानावर रंगणार अाहे.
युवा गाेलंदाज कुलदीप यादव (२/१६) अाणि बुमराहच्या (२/१७) धारदार गाेलंदाजीमुळे पाहुण्या अाॅस्ट्रेलियाला १८.४ षटकांत ८ बाद ११८ धावा काढता अाल्या. पावसाच्या व्यत्ययाने सामना थांबला हाेता. प्रत्युत्तरात डीएलनुसार भारताला ६ षटकांत ४८ धावांचे लक्ष्य मिळाले हाेते. भारताने १ गड्याचा माेबदल्यात तीन चेंडू राखून सामना जिंकला. शिखर धवन (नाबाद १५) अाणि विराट काेहली (नाबाद २२) यांच्या झंझावाताच्या बळावर भारताने सामना जिंकला. राेहित शर्माने विजयात ११ धावांचे माेलाचे याेगदान दिले.

भारताने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. कर्णधार काेहलीचा हा निर्णय भुवनेश्वरकुमारने वाॅर्नरला (८) बाद करून याेग्य ठरवला.

फिंच-मॅक्सवेलने सावरले : सलामीवीर अॅराेन फिंचने शानदार खेळी करताना संघाचा डाव सावरला. त्याने ग्लेन मॅक्सवेलसाेबत दुसऱ्या गड्यासाठी ४७ धावांची भागीदारी रचली. चहलने मॅक्सवेलला बाद केले. मॅक्सवेलने १६ चेंडूंत १७ धावांचे याेगदान दिले.
विजयी अर्धशतक
रांचीच्या मैदानावरील सलामीचा सामना जिंकून यजमान भारताने अापल्या टी-२० करिअरमध्ये विजयाचे अर्धशतक पूर्ण केले. भारताचा हा ८४ वा टी-२० सामना हाेता. यात भारताने अाज विजयाची पन्नाशी गाठली.
चहलकडून मॅक्सवेल झाला चाैथ्यांदा बाद
यजुवेंद्र चहलकडून मॅक्सवेल दाैऱ्यात चाैथ्यांदा बाद झाला. यामध्ये वनडे मालिकेतील तीन अाणि सलामीच्या टी-२० सामन्याचा समावेश अाहे. चहलने शनिवारी रांचीत ग्लेन मॅक्सवेलला बुमराहकरवी झेलबाद केले.

Post a Comment

 
Top