0
संशियतावर नेम धरताना महिला पोलिस अधिकारी


लास वेगास - अमेरिकेतील लास वेगास येथे रविवारी रात्री एका म्यूझिक फेस्टिव्हलमध्ये अंदाधूंद फायरिंगची घटना घडली. मांडले बे रिसॉर्ट आणि कॅसिनोमध्ये हा कार्यक्रम सुरु होता. तेव्हाच शेजारच्या एका हॉटेलच्या 32व्या मजल्यावरुन तीन जणांनी अॅटोमॅटिक रायफलने म्यूझिक फेस्टिव्हलवर फायरिंग सुरु केले. यात आतापर्यंत 20 जण ठार झाल्याची माहिती आहे. सुरुवातीला 2 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती होती.
सुरुवातीला लोकांना वाटले की आतषबाजी सुरु आहे. मात्र जेव्हा सुरक्षा रक्षक मारला गेला तेव्हा लोकांना हल्ल्याची कल्पना आली. त्यानंतर एकच गोंधळ उडाला आणि सर्वजण मिळेल त्या मार्गाने धावत सुटले. एक संशयित मारला गेला असल्याची माहिती आहे. लास वेगास पोलिसांचा दावा आहे की आता घटनास्थळी एकही हल्लेखोर उपस्थित नाही.
लास वेगासमध्ये केव्हा आणि कुठे झाला हल्ला ?
- लास वेगास हे क्लब, कसिनो आणि नाइट लाइफसाठी प्रसिद्ध आहे. हल्ला येथील मांडले बे (Mandalay Bay) रिसॉर्ट अँड कसिने येथे झाला. 
- हा रिसॉर्ट 15 एकर परिसरात असून येथे गेल्या 4 वर्षांपासून तीन दिवसीय कंट्री म्यूझिक फेस्टिव्हल होत असतो. रविवारी रूट 91 म्यूझिक फेस्टिव्हलचा अखेरचा दिवस होता. 
- ही घटना स्थानिक वेळेनुसार रात्री 10.30 वाजता घडली. (भारतीय वेळेनुसार सोमवारी सकाळी) विशेष म्हणजे हल्ल्यापूर्वी एक धमकीचा फोन कॉलही पोलिसांना आला होता.
कसा झाला हल्ला ?
- ज्या रिसॉर्टमधील म्यूझिक फेस्टिव्हलवर हल्ला झाला त्याच्या शेजारी असलेल्या एका हॉटेलच्या 32 व्या मजल्यावरुन फायरिंग करण्यात आले. 
- हल्ल्यात सर्वात आधी कॅसिनोचा सुरक्षा रक्षक मारला गेला. त्यानंतर घटनास्थळी लोक सैरावैरा धावू लागले. तीन हल्लेखोर असल्याची प्राथमिक माहिती आहे.
हल्ल्यानंतर कॅसिनोमध्ये काय झाले ?
- म्यूझिक फेस्टिव्हलच्या अखेरच्या दिवशी सिंगर जेसन अॅल्डियन परफॉर्मान्स देत होता. गोळीबाराचा आवाज झाल्याबरोबर जेसनने गाणे बंद केले. 
- शेजारच्या हॉटेलमधील लोकांनी सांगितले की कॅसिनो कॅम्पसमध्ये गोंधळ उडालेला दिसत होता. सर्वच लोक बाहेर पडण्याचा मार्ग शोधत होते. 
- हल्यानंतर लास वेगासच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन 20 पेक्षा जास्त उड्डाणे वळवण्यात आली आहेत. विमानतळ बंद केले गेले आहे.

Post a Comment

 
Top