
हैदराबाद - हे छायाचित्र पोलिसांच्या सजगपणाची कथा सांगते. हैदराबादच्या नेमपल्लीमध्ये ४ महिन्यांचा फैजान आईसोबत फुटपाथवर झाेपलेला होता. रात्री ३ वाजता २ जणांनी त्याचे अपहरण केले. पोलिसांनी १६ तासांतच फैजानला शोधून काढले. दोन्ही अपहरणकर्त्यांनाही अटक झाली. ते बाळाला विकण्याची तयारी करत हाेते. घटनेनंतर इन्स्पेक्टर अार. संजयकुमार यांनी बाळाला हातात घेताच ते हसू लागले. हैदराबादच्या अति. पोलिस आयुक्त (गुन्हे शाखा) स्वाती लकरा यांनी शनिवारी हा फोटो ट्विट केला.
Post a Comment