0
IND vs AUS वनडे : ऑस्ट्रेलियाला पहिला दणका, शंभराव्या मॅचमध्ये शतक ठोकणारा वॉर्नर बाद

बंगळुरू -भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सिरीजच्या चौथ्या वनडे मॅचमध्ये ऑस्ट्रेलियाला पहिला दणका बसला आहे. आपल्या करिअरच्या शंभराव्या मॅचमध्ये शतक ठोेकणारा वॉर्नर बाद झाला. ऑस्ट्रेलियाने 35 ओव्हरमध्ये 1 विकेट गमावून 231 धावा केल्या आहेत. तर वॉर्नरने 119 बॉलवर 124 धावा केल्या.
तत्पूर्वी ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकूण प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. सिरीजमध्ये आधीच भारताने 3-0 अशी आघाडी घेतली आहे. तरीही ऑस्ट्रेलियाला व्हाइटवॉश करण्याचा भारताचा प्रयत्न आहे.
भारतीय गोलंदाज चमकले
भारतीय वेगवान गोलंदाज भुवनेश्वर, बुमराह ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांची वाताहत केली. डेथ ओव्हरमध्ये शानदार प्रदर्शन केले. चाहल व कुलदीप यादव या युवा फिरकीपटूंनी जबरदस्त प्रदर्शनासह सर्वांचे लक्ष्य वेधले. त्यांनी अनुभवी गोलंदाजा कमतरता भासू दिली नाही.

१० सामने जिंकण्याची संधी
विराट कोहलीने आपल्या नेतृत्वाखाली सलग ९ सामने जिंकले आहेत. आता सलग १० सामने जिंकून भारतीय विक्रम करण्याची त्याला संधी आहे. सर्वाधिक २१ सामने जिंकण्याचा विक्रम ऑस्ट्रेलियाच्या नावे आहे. दक्षिण आफ्रिका व पाकिस्तानने प्रत्येकी १२ सामने जिंकले.

Post a Comment

 
Top