स्पोर्ट्स डेस्क - ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सिरीजचा चौथा वनडे सामना बेंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडिअमवर गुरुवारी खेळला जाणार आहे. टीम इंडियाने 5 मॅचच्या सिरीजमध्ये आधीच 3-0 अशी आघाडी घेतली आहे. भारतीय संघ सध्या नंबर एकच्या स्थानी आहे. श्रीलंकेप्रमाणे ऑस्ट्रेलियाचा देखील क्लीनस्वीप होइल अशी अपेक्षा केली जात आहे. यासाठी टीम इंडिया कुठल्याही प्रकारचे रिस्क घेण्यास तयार नाही.
विराटकडे नवा रेककॉर्ड बनवण्याची संधी
- भारताने इंदूरमध्ये झालेला तिसरा सामना जिंकल्यानंतर बेंगळुरूतही सलग चौथा सामना जिंकल्यास टीम इंडियाचे नाव इतिहासात नोंदवले जाईल. सलग 10 वनडे सामने जिंकणाऱ्या संघांमध्ये भारताचे नाव समाविष्ट होईल.
- टीम इंडियाने यावर्षीच सलग 9 सामने जिंकण्याचा विक्रम केला आहे. यापूर्वी धोनीच्या नेतृत्वात नोव्हेंबर 2008 ते फेब्रुवारी 2009 मध्ये भारताने सलग 9 वनडे जिंकण्याचा विक्रम केला होता.
- भारताने सध्या जुलैमध्ये वेस्ट इंडीजवर 11 धावांनी विजय मिळवल्यानंतर तेव्हापासून आतापर्यंत एकही सामना हारलेला नाही. तर ऑस्ट्रेलियाने 26 जानेवारी रोजी पाकिस्तानला पराभूत केल्यानंतर एकही वनडे जिंकलेला नाही.
- सलग 10 वनडे जिंकण्याचे विक्रम एकदा न्युजीलंड आणि दोन वेळा इंग्लंड, पाकिस्तान, वेस्ट इंडीज आणि श्रीलंकेने करून दाखवले आहे.
- दक्षिण अफ्रिकेने 5 वेळा सलग 10 सामने जिंकण्याचा तर, ऑस्ट्रेलियाने 6 वेळा सलग 10 सामने जिंकण्याचा विक्रम केला. बांगलादेश आणि झिम्बाब्वे यांनी एकदाही हा विक्रम केलेला नाही.
होऊ शकतात हे बदल
- तिसऱ्या वनडे सामन्यानंतर कॅप्टन विराट कोहलीने उर्वरीत दोन सामन्यांत इतरांना संधी देणार असे म्हटले होते.
- यात अक्षर पटेल, लोकेश राहुलला संधी मिळण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.
- बेंगळुरूमध्ये जवळपास 4 वर्षांनंतर आंतरराष्ट्रीय वनडे खेळला जात आहे. येथे शेवटचा वनडे भारत आणि ऑस्ट्रेलियातच झाला. त्यामध्ये भारताने ऑस्ट्रेलियाला 57 धावांनी पराभूत केले.
- ऑस्ट्रेलियन ओपनर डेविड वॉर्नरचा हा 100 वा वनडे सामना ठरणार आहे.

Post a Comment