0
घटस्थापनेच्या मुहूर्तावर सरकारी कर्मचाऱ्यांसाठी GOOD NEWS, महागाई भत्त्यात 4% वाढमुंबई- सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 4 टक्क्यांची वाढ केल्याची घोषणा राज्य सरकारने आज (गुरूवारी) केली आहे. ही पगारवाढ 1 जानेवारी 2017 पासून लागू होणार असून ऑगस्टपासूनचा वाढीव महागाई भत्ता रोख स्वरूपात देण्यात येणार आहे. त्यापूर्वीच्या 7 महिन्यांमधील वाढीव महागाई भत्ता देण्याविषयी स्वतंत्र आदेश काढण्यात येणार आहे. 50 लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांना आणि 61 लाख निवृत्त वेतनधारकांना या निर्णयाचा लाभ होणार आहे.

राज्य सरकारचे तब्बल 16 लाख कर्मचारी आणि 6 लाख निवृत्ती वेतनधारकांना वाढीव महागाई भत्त्याचा फायदा होणार आहे. एप्रिल महिन्यातही राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 7 टक्क्यांची वाढ करण्यात आली होती. तेव्हा महागाई भत्ता 132 टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आला होता. आता त्यात आणखी 4 टक्क्यांची भर पडली आहे.

Post a Comment

 
Top