0
गरबा Dhoom: रात्री उशिरापर्यंत मस्ती, दांडियाचा असा दिसला जोश

जयपूर - दैनिक भास्करच्या अभिव्यक्ती गरबा महोत्सवाच्या तिसऱ्या दिवशीही लोक पूर्ण जोशात दिसले. मोठ्या संख्येने येथे लोक गरब्याच्या तालावर ठेका धरताना दिसले. व्हीटी रोडवरील राजस्थान हाउसिंग बोर्ड मैदानात चार दिवसांपर्यंत महाआरतीसह गरबा रास आणि दांडियाच्या आवाजाने अवघ्या शहराला आकर्षित केले.
हे आहे खास...
- एकीकडे अभिव्यक्ती महोत्सवातील स्पर्धक प्रोफेशनल डान्सर्सप्रमाणे गरबा करताना दिसले, तर दुसरीकडे जनरल सर्कलमध्येही लोकांची क्रेझ पाहायला मिळाली.
- गरब्याच्या तालावर लोकांनी बॉलीवूडच्या संगीतावरही थिरकण्याचा आनंद घेतला.
- तिसऱ्या दिवशीही अगोदर महाआरती आणि नंतर गरबा झाला. यानंतर बॉलीवूड नंबर्स प्ले करण्यात आले. मग लोकांनी दांडियाचा आनंद घेतला.
- रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या या मस्तीत प्रत्येक जण गरब्याच्या रंगात न्हाऊन निघाला होता.
- यानंतर लाइव्ह म्युझिकवर अगोदर गरबा राउंडनंतर मिक्स बीट्सवर फोक फ्यूजनचे अनेक अंदाज दिसले. मग सुरू झाली दांडियाची खनक जी प्रत्येकाला हवीहवीशी वाटणारी ठरली.

Post a Comment

 
Top