0



मुंबई- नालासोपारा येथे एकाच कुटुंबातील चौघांनी विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. त्यापैकी बाप-लेकीचा मृत्यू झाला असून महिला आणि दुसरी मुलगी बचावली आहे.

नालासोपारा पूर्वेकडील प्रगतीनगरमध्ये मनिष सिंग (30) हा कुटुंबासह राहत होता. मनिषवर बँकेचे कर्ज असल्यामुळे आलेल्या नैराश्यातून त्याने टोकाचे पाऊल उचलल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.

रविवारी (17 सप्टेंबर) रात्री मनिषसह संपूर्ण कुटुंबाने विष पाजून आयुष्य संपवण्याचा प्रयत्न केला. यामध्ये मनिषसह सात वर्षांच्या प्रगतीचा मृत्यू झाला तर तीन वर्षांची पिंकी आणि पत्नी प्रतीक्षा बचावली आहे. प्रतीक्षा आणि पिंकीवर वसई- विरार महानगरपालिकेच्या रुग्णालयात अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे. या दोघींची प्रकृती चिंताजनक आहे. रात्री या कुटुंबाने विषप्राशन केले होते. सकाळी नातेवाइकांमुळे ही घटना उघड झाली.

Post a Comment

 
Top