स्पोर्ट्स डेस्क - ऑस्ट्रेलिया आणि भारताची वनडे सिरीज रविवारपासून सुरू होत आहे. सिरीजमध्ये सर्वांच्या नजरा विराट आणि धोनीकडे लागल्या आहेत. दोघेही टीमचे सीनियर क्रिकेटर आहेत. विराट वनडे आणि टी-20 मध्ये कॅप्टन झाल्यानंतर पहिल्यांदा ऑस्ट्रेलिया विरुद्ध लिमिटेड सिरीज खेळत आहेत. श्रीलंका दौऱ्यात जबरदस्त फॉर्ममध्ये परतलेला धोनी पुन्हा होम सिरीजमध्ये चकमण्यासाठी सज्ज आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्ध सेंचुरी लावणारा धोनी एकमेव भारतीय कर्णधार आहे.
असा आहे विक्रम?
- धोनी कर्णधार असताना ऑस्ट्रेलिया विरुद्ध सेंचुरी लावणारा पहिला कॅप्टन बनला. त्याने सर्वप्रथम हा विक्रम 2009 मध्ये करून दाखवला.
- 28 ऑक्टोबर 2009 ला नागपूरमध्ये झालेल्या इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया वनडे सामन्यात धोनीने 107 बॉलमध्ये 124 धावा ठोकल्या होत्या. टीम इंडियाने हा सामना 99 धावांनी जिंकला होता.
- दुसऱ्यांदा धोनीने 19 ऑक्टोबर 2013 रोजी मोहालीत ऑस्ट्रेलिया विरुद्ध सेंचुरी लावली होती. त्यावेळी त्याने नाबाद 139 धावांची खेळी खेळली होती. ही मॅच ऑस्ट्रेलियाने 4 विकेट्सने जिंकली होती.
क्रिकेटचा देव सचिन आणि गांगुलीही करू शकले नाहीत
- कॅप्टन असताना सचिनने ऑस्ट्रेलिया विरुद्ध 8 सामने तर सौरव गांगुलीने 16 सामने खेळले होते. तसेच अजहरुद्दीनने 21 सामने खेळले होते. मात्र, हे तिन्ही दिग्गज खेळाडू ऑस्ट्रेलिया विरुद्ध एकही शतक ठोकू शकले नाहीत.
- ऑस्ट्रेलिया विरोधात कॅप्टन म्हणून सर्वाधिक सामने खेळण्याचा विक्रम सुद्धा धोनीच्या नावे आहे. त्याने कर्णधार असताना 40 सामने खेळले, त्यापैकी 14 सामने भारताने जिंकले आहेत.
Post a Comment