
परळ-एलफिन्सटन पुलावर झालेल्या भीषण चेंगराचेंगरीत 25 हून अधिक प्रवासी ठार झाले होते. त्यांना रक्ताची कमी पडू नये म्हणून रक्तदानाचे आवाहन केईएम रुग्णालयाकडून करण्यात आले आणि काही वेळातच मुंबईकरांनी रक्तदानासाठी रांग लावली. त्यामुळे पुरेसा पुरवठा झाला असल्याचे सांगत मुंबई पोलिसांनी आभार मानले. तसेच आता रक्तदान बंद करण्यात आल्याची माहिती दिली आहे.
रुग्णालयाने केलेल्या आवाहनानंतर मुंबई पोलिसांनीही तसे ट्विट केले होते. A-निगेटीव्ह, B-निगेटीव्ह, AB-निगेटीव्ह रक्तगट असणाऱ्यांनी केईएम रुग्णालयाशी संपर्क साधण्याचं आवाहन मुंबई पोलिसांना मुंबईकरांना केलं होतं. मुंबईकरांनी प्रचंड प्रतिसाद दिला, त्याबद्दल पोलिसांनी मुंबईकरांचे आभार मानले आहेत. तसेच आता पुरेसा रक्त पुरवठा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
Post a Comment