
मुंबई - पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आलेले अॅक्टर टॉम अल्टर यांचे मुंबईतील राहत्या घरी निधन झाले आहे. ते 67 वर्षांचे होते. स्किन कँसर झाल्याने त्यांच्यावर उपचार सुरू होते. काही दिवसांपूर्वीच त्यांच्या मॅनेजरने याबाबत माहिती दिली होती. त्यांनी 300 पेक्षा जास्त चित्रपटांत आणि अनेक टीव्ही शोमध्ये भूमिका केल्या होत्या. त्यांनी तीन पुस्तकेही लिहिली आहेत. 1988 मध्ये सचिन तेंडुलकरचा इंडरव्ह्यू घेणारे टॉम अल्टर पहिले व्यक्ती होते.
याच महिन्यात झाले होते अॅडमिट
- न्यूज एजन्सीतील वृत्तानुसार टॉम यांना चौथ्या स्टेजचा कँसर होता. याच महिन्यात त्यांना हॉस्पिटलमध्ये अॅडमिट करण्यात आले होते.
- टॉम यांचे मॅनेजर इस्माइल अन्सारी यांनी सांगितले की, 28 सप्टेंबर गुरुवारी ते घरी परत आले होते. पण शुक्रवारी त्यांनी श्वास घ्यायला त्रास होत असल्याचे सांगितले.
- त्यांचा मुलगा जेमीने सांगितले की, ते कँसरचा सामना करत होते. त्यांना नेहमी वाटायचे की, ते यातून बाहेर येतील. गेल्यावर्षी त्यांचा एक अंगठा कापावा लागला होता.
Post a Comment