0
गर्लफ्रेंड बोलत नव्हती, ब्रेकपनंतर उतावीळ बॉयफ्रेंडने केले असे कृत्य...

चंदीगड - येथील पोलिसांना शुक्रवारी येथील भाजीपाला मंडीत एका मुलीचा मृतदेह गळा चिरलेल्या अवस्थेत सापडला आहे. या मुलीचे नाव पूजा होते तसेच तिच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी एक्स बॉयफ्रेंड सुनीलला अटक केली आहे. पोलिस अधिकारी जसपाल सिंह भुल्लर यांनी दिलेल्या माहितीनुसार, 17 वर्षीय पूजा आणि 19 वर्षीय सुनील एकमेकांना आधीपासूनच ओळखत होते. तिने गेल्या काही दिवसांपासून सुनीलला बोलणे बंद केले होते. तिच्या न बोलण्यावर सुनील संतापला होता. वारंवार आग्रह करूनही बोलण्यास नकार देणाऱ्या पूजाचा सुनीलने गळा चिरून खून केला. पोलिस या घटनेचा एकतर्फी प्रेम म्हणून तपास करत आहेत.
असा घडला प्रसंग
- चंदीगडच्या सेक्टर-26 येथील मंडी परिसरात पूजा आणि आई ज्ञानवती भाजीपाला विक्रीसाठी एका ठिकाणी स्टॉल लावत होते. आई ज्ञानवती शुक्रवारी दुपारी घरी गेली असताना स्टॉलवर पूजा एकटी होती. 
- मंडीत ती पाणी भरण्यासाठी गेली, त्याचवेळी सुनील तिच्याकडे पोहोचला. 
- घटनास्थळी उपस्थित प्रत्यक्षदर्शींनी सांगितल्याप्रमाणे, सुनीलने खूप वेळ पूजाला त्याच ठिकाणी अडवून ठेवले होते. दोघेही बोलत होते. त्याचवेळी अचानक सुनीलने चाकू काढला आणि तिच्या गळ्यावर वार केला. सुरुवातीला पूजाला काहीच समजले नाही. ती तेथून पळून जात होती, 20 मीटरपर्यंतच गेली असेल तेव्हा ती अतीरक्तस्रावाने खाली कोसळली.
आईला सुनीलबद्दल काहीच माहिती नाही
- घटनास्थळावरून सुनील पसार झाला. यानंतर पोलिसांनीच भाजीपाला बाजारात येऊन पूजाला अतिशय गंभीर अवस्थेत रुगणालयात नेले. मात्र, डॉक्टरांनी आत घेण्यापूर्वीच तिला मृत घोषित केले. 
- मार्केटमध्ये सीसीटीव्ही होते. मात्र, ज्या ठिकाणी ही घटना घडली तेथे कॅमेरा कव्हर करत नव्हता. तरीही गळ्यावर घाव झाल्यानंतर पूजा जेव्हा पळता-पळता कोसळली ती घटना सीसीटीव्हीत कैद झाली.
- दरम्यान, घटनास्थळावरून चाकू आणि रक्तासह इतर काही पुरावे गोळा केले असून या घटनेचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. 
- आई ज्ञानवतीला याबद्दल विचारले असता तिने आपल्याला सुनील कोण हेच माहिती नसल्याचे सांगितले. सुनील आणि पूजा एकमेकांना कधीकाळी बोलत होते हे तर तिला माहितीच नव्हते. एक माणूस तिला त्रास देत होता एवढीच तिला माहिती होती.
- काही दिवसांपूर्वीच पूजाला त्रास देणाऱ्या अज्ञात व्यक्तीविरोधात पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली होती. त्या व्यक्तीने पूजाचा पाय मोडला होता. पूजाच्या मोठ्या बहिणीने काही दिवसांपूर्वीच आत्महत्या केली. त्यासंदर्भातील कारण अजुनही समोर आलेले नाही.

Post a Comment

 
Top