0
पित्याने दुर्गेच्या प्रतिमेसमोर कापला मुलाचा गळा, वाचा मग काय म्हणाला...

राजनांदगाव (छत्तिसगड ) - घरात दुर्गा मातेची पूजा सुरू होती. नवमीच्या हवणानंतर ज्योत पेटवण्यात आली होती. त्याचवेळी नशेत तर्र असलेल्या एका मुलाने जेवणाची थाळी आई दुर्गेच्या प्रतिमेवर फेकूण दिवा विझवला. मुलाच्या या कृत्यावर वडील एवढा संतापला की त्याने दुर्गेच्या प्रतिमेसमोरच आपल्या मुलाचा गळा चिरला. यानंतर आरोपी पित्याने स्वतः पोलिसांत जाऊन आपल्या गुन्ह्याची कबुली दिली.
दारुड्या मुलाने कुटुंब वैतागला होता...
- ही धक्कादायक घटना राजनांदगाव जिल्ह्यातील मोहारा येथील आहे. येथे आपल्या मुलाच्या रोजच्या कृत्यांना कंटाळून पित्याने त्याची हत्या केली. आधीच त्याच्या कुरापतींनी कुटुंब वैतागला होता. त्यातच मुलाने उष्ट नॉन व्हेजची थाळी देवीच्या मूर्तीसमोर फेकून दिली. यानंतर आपण हे टोकाचे पाऊल उचलले असे त्याने पोलिसांना सांगितले आहे.
- पोलिस अधिकारी विनोद मंडावी यांनी सांगितल्याप्रमाणे, हा प्रकार शुक्रवारी रात्री 9 च्या सुमारास घडला आहे. यात 22 वर्षीय सुरेंद्र उर्फ मुन्ना नेहमीप्रमाणेच दारु पिऊन घरी आला होता. त्याने आपल्यासोबत नॉन व्हेज देखील आणले होते. आपल्याला दिलेल्या जेवणाच्या थाळीत त्याने ते खाल्ले. 
- त्याचवेळी पित्याने त्याला अडवले. घरात पूजा, हवण असल्याने नॉन व्हेज खाऊ नये असे मुलाला सांगितले. तेव्हा सुरेंद्र वडिलांवर भडकला. तसेच मोठ-मोठ्याने ओरडून शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. 
- सुरेंद्रचा राग पाहून आई आणि बहिण सुद्धा त्याच्याकडे समजावण्यासाठी पोहोचले. मात्र, शांत होणे सोडून तो आणखी भडकला. तसेच रागाच्या भरात देवी समोरचा दिवा विझवला आणि नॉन व्हेजची उष्ट थाळी देवीच्या प्रतिमेवर फेकली. 
- सुरेंद्रच्या या कृत्यावर पिता गोपीचंद प्रचंड संतापला. मुलाला कुठल्याही वस्तूने मारण्यासाठी इकडे-तिकडे शोधताना कुऱ्हाड सापडली. त्याच कुऱ्हाडाने पित्याने सुरेंद्रच्या डोक्यावर प्रहार केला. त्यानंतर धारदार कुऱ्हाडाने गळ्यावर प्रहार केले. यात सुरेंद्रचा जागीच मृत्यू झाला. 
- आरोपी गोपीचंदने पोलिसांना सांगितल्याप्रमाणे, त्याच्या कुटुंबातील मुलाने सोडून सगळ्यांनीच उपास ठेवला होता. तसेच घरात अखंड ज्योत लावली होती. 
- पोलिसांना या घटनेची माहिती रात्री 10 वाजत गोपीचंद पोलिसांत गेल्यानंतरच मिळाली. त्यानंतर पोलिसांनी घरात येऊन पुढील तपास केला.

Post a Comment

 
Top